मुंबई, दि. २४ – राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना आखण्यासाठी राज्य शासनाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या समितीमध्ये नऊ मंत्र्यांचा समावेश असून मुख्य सचिव हे समिती सदस्य आहेत. (maharashtra drought cabinet subcommittee chandrashekhar bawankule)

