10 वीमध्ये कमी गुण मिळाले? निराश होऊ नका; टेलीमानस हेल्पलाईनवर करा कॉल आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या !

10th Result Counselling 2026 पुणे : दहावीच्या निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये पुढील शिक्षण, शाखा निवड व करिअर नियोजनाबाबत संभ्रम निर्माण होत असतो. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी ताण न घेता उपलब्ध समुपदेशन सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मानसिक आधार मिळावा यासाठी विशेष ऑनलाइन समुपदेशन सेवा सुरू केली आहे.

निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाल, करिअर निवड, ताणतणाव व्यवस्थापन तसेच निकालासंदर्भातील मानसिक दडपण कमी करण्यासाठी ही सेवा निकालाच्या दिवसापासून पुढील ८ दिवस सुरू राहणार आहे. राज्य मंडळ स्तरावर यासाठी १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना अतिरिक्त मानसिक आरोग्य सहाय्य मिळावे यासाठी टेलीमानस हेल्पलाईन क्रमांक १४४१६ तसेच मनोदर्शन हेल्पलाईन ८४४८४४०६३२ वरदेखील समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून राज्यभरातील ३१५ समुपदेशकांची सेवाही विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. संबंधित समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक व पत्ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.

समुपदेशनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समुपदेशकांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.
९९६०६४४४११, ७९७२५७३७४२, ९८३४०८४५९३, ९३५९९७८३१५, ८१६९२०२२१४, ९३७१६६१२५५, ७२०८४२९३८१, ७७०९१५६०६८, ८४२११५०५२८ आणि ९४०४७८३९९६.

Local ad 1