पुणे : अखाती देशांतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचे पडसाद पुण्यातही उमटले आहेत. भारत सरकारच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या निर्देशानुसार देशात उपलब्ध असलेला प्रोपेन व ब्यूटेन गॅस प्राधान्याने घरगुती एलपीजी पुरवठ्यासाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गॅसची उपलब्धता तात्पुरती कमी झाली असून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील गॅसवर चालणाऱ्या काही शवदाहिन्या तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. (pune gas crematorium closed electric crematorium use increase)
Pune Municipal Budget 2026-27 | पुणे महापालिका बजेट 2026-27 : उत्पन्न वाढीसाठी ठोस उपाय नाहीत
या पार्श्वभूमीवर नागरिकांना अडचण येऊ नये म्हणून शहरातील विद्युत शवदाह गृहांचा वापर वाढविण्यावर महापालिकेने विशेष भर दिला आहे. प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत अनेक गॅस दाहिन्या बंद राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महापालिकेने सांगितले की, अंतिम संस्काराची प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील विविध स्मशानभूमींमध्ये असलेल्या विद्युत दाहिन्या पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आल्या आहेत. विशेषत: वैकुंठ स्मशानभूमीवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी नागरिकांनी आपल्या परिसरातील जवळच्या विद्युत दाहिन्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, वैकुंठ स्मशानभूमीतील गॅसवर चालणाऱ्या तीन दाहिन्या सध्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी तेथे पाच विद्युत दाहिन्या कार्यरत ठेवण्यात आल्या आहेत.
PMC Budget Pune 2026-27 : वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा आणि नव्या 32 गावांच्या विकासावर विशेष भर
दरम्यान, बिबवेवाडी स्मशानभूमीत एमजीएनएलकडून गॅसचा पुरवठा सुरू असल्याने तेथील दोन गॅस दाहिन्या कार्यरत आहेत. त्यामुळे धनकवडी आणि कात्रज परिसरातील नागरिकांना अंतिम संस्कारासाठी तेथील सुविधा वापरता येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, शहरात उपलब्ध असलेल्या विद्युत दाहिन्यांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून सर्व व्यवस्था सुरळीतपणे चालू राहतील.
शहरातील प्रमुख विद्युत दाहिन्या
* येरवडा स्मशानभूमी – गुंजन चौक, नगर रोड
* खराडी स्मशानभूमी – खराडी गाव
* कैलास स्मशानभूमी – एसएसपीएमएस मैदानाजवळ, संगमवाडी
* कोथरूड स्मशानभूमी – गुरुगणेश नगर
* बाणेर स्मशानभूमी – औंध–बाणेर लिंक रोड
* गंगानगर स्मशानभूमी – हडपसर

