...

Pune Police New Stations 2025 पुण्यात नव्या ५ पोलिस ठाण्यांना मंजुरी ; कुठे असणार पोलिस ठाणे जाणून घ्या..

Pune Police New Stations 2025। पुणे : शहराचा वेगाने वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या आणि बदलते गुन्हेगारी स्वरूप लक्षात घेऊन पुण्यात आणखी ५ नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच २ नवीन पोलिस उपायुक्त (DCP) झोन उभारण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे. यासाठी तब्बल ८३० नवीन मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.

 

PMC Parking Policy Pune 2025 । सात वर्षे रखडलेले धोरण आता लागू होणार ; पार्किंगसाठी मोजावे लागणार पैसे

 

 

ही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८ ऑगस्ट रोजी केली होती. त्यानुसार १५ सप्टेंबर रोजी गृहविभाग व वित्त विभागाकडून अधिकृत मान्यता मिळाली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा** यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

गेल्या २० वर्षांत पुण्यात नवीन पोलिस ठाण्यांचा एकही प्रस्ताव शासनाकडे गेला नव्हता. मात्र, आता शहरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक, तसेच गुन्ह्यांचा बदलता चेहरा लक्षात घेता नव्या पोलिस ठाण्यांमुळे पुणे पोलिस दल अधिक सक्षम होणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील नागरिकांना वेगवान आणि प्रभावी पोलीस सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

पुण्यातील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करा – बाबुराव चांदेरे

 

राज्याच्या इतिहासातील विक्रम

अवघ्या एका वर्षात पुण्यात एकूण १२ पोलिस ठाण्यांना व २ झोनला मंजुरी मिळाली असून हे राज्याच्या इतिहासात प्रथमच घडले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये ७ नवीन ठाण्यांना मान्यता मिळाली होती, ज्यासाठी ८१६ पदे मंजूर झाली होती. आता आणखी ५ नवीन ठाण्यांना मंजुरी मिळाल्याने ८३० अतिरिक्त पदे निर्माण होणार आहेत.

 

 

नवी पोलिस ठाण्यांची यादी

1️⃣ लोहगाव (विमानतळ परिसर)
2️⃣ नऱ्हे
3️⃣ लक्ष्मीनगर (येरवडा)
4️⃣ मांजरी (हडपसर)
5️⃣ येवलेवाडी (कोंढवा)

Local ad 1