...

घाटमाथ्यावर अतिवृष्टी : ताम्हिणीत ३७० मिमी पावसाची नोंद

पुणे परिसरात जलसाठ्यात मोठी वाढ

पुणे : पुणे जिल्ह्यातील घाटमाथा भागात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा मारा सुरूच असून, ताम्हिणी येथे शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत तब्बल ३७० मिमी पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. जोरदार पावसामुळे नद्या, ओढ्यांची पातळी झपाट्याने वाढली असून, काही भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. (ghatmatha heavy rain tamhini 370mm pune dam water level update june 2025)

 

पुण्यातील ३७ धोकादायक वाड्यांची वीज आणि पाणी पुरवठा तोडणार

 

 

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग

गुरुवारी रात्री १५,००० क्यूसेक दराने सुरू असलेला विसर्ग शुक्रवारी सकाळी १२,००० क्यूसेक, तर दुपारी ९,००० क्यूसेक करण्यात आला. तर रात्री तो कमी करुन  संध्याकाळी 07:00 वा. 4565 क्यूसेक्स करण्यात आला आहे.

 

 

पुण्यातील ३७ धोकादायक वाड्यांची वीज आणि पाणी पुरवठा तोडणार

 

 

पुणे शहराच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ

घाटमाथ्यावरच्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही मुख्य धरणांमध्ये एकूण ९.८ टीएमसी (३१%) पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा केवळ ३.५७ टीएमसी (१२.२३%) होता. जून महिन्याच्या सुरुवातीलाच सुरू झालेल्या चांगल्या पावसामुळे जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत असून पाणीटंचाईची भीती काहीशी कमी झाली आहे.

 

प्रमुख भागांतील पावसाची नोंद (२० जून सकाळपर्यंत)
ताम्हिणी – 370 मिमी

लोणावळा – 205 मिमी

कुरवंडे – 129.5 मिमी

गिरीवन – 108.5 मिमी

माळीण – 104.5 मिमी

भोर – 79 मिमी

प्रमुख धरणांतील पाणीसाठा (२० जून २०२५ पर्यंत):
खडकवासला – 79%

पानशेत – 25%

वरसगाव – 35%

टेमघर – 13%

 

 

भामा आसखेड धरणाचा साठा दुप्पटीने वाढला

खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात २० जूनपर्यंत २९.७६% साठा जमा झाला असून, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. धरणात सध्या २.९१ टीएमसी पाणी असून यातील २.४३ टीएमसी उपयुक्त साठा आहे. यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरालाही या धरणातून पाणीपुरवठा सुरू होणार असून, २.१४ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.

 

 

 

Local ad 1