Heavy rains in Pune । पुण्यात दोन तासांत 90 मीमी पावसाची नोंद

रात्री एक वाजताही पाऊस सुरु

Heavy rains in Pune : सोमवारी रात्री पुन्हा अतिवृष्टी झाली असून, नऊ वाजता सुरु झालेला पाऊस (Heavy rains in Pune) रात्री एक वाजेपर्यंत सुरुच होता. पावसामुळे रस्त्यावर प्रचंड पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्यांना जिथे आहोत, त्याच ठिकाणी सुरक्षित रहा, असे एकमेकांना सुचवत होते. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत तब्बल 90 मीमी पावसाची नोंद झाली आहे. (Heavy rains in Pune 90 mm of rain recorded in two hours)

 

 

शहरासह अनेक जिल्ह्यातील अनेक भागात तासांत वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. काही तास पडलेल्या पावसामुळे शरातील अनेक रस्त्यांवर पुरस्थिती निर्माण झाली होती. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. तर अनेक ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या. शिवाजीनगर परिसरात रात्री ११ः३० पर्यंत तब्बल ८१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज झालेल्या पावसामुळे काही तासांत पुणे पुन्हा तुंबल्याने सर्वसामान्य पुणेकरांचे हाल झाले.

Heavy rains in Pune

 

दरम्यान, पुणे, पिंपरीचिंचवड आणि लगतच्या क्षेत्रावर सध्या ९ ते ११ किमी उंचीचे ढग सक्रिय आहेत. पावसाचा जोर पुढील तासभर राहण्याची शक्यता आहे. सखल भागांत, रस्त्यांवर पाणी साचणे, फ्लॅश फ्लड, झाडे पडणे, वाहतूक खोळंबणे आदी घटना शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Heavy rains in Pune : 90 mm of rain recorded in two hours)

 

दगडूशेठ मंदिरासमोर झालेल्या पावसामुळे तर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुर आला होता. पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. अनेक वाहने या पाण्यात अडकली होती. राती १०. ४० च्या सुमारास सोमवार पेठ येथे मीटर बॉक्स शॉर्टसर्किट ची घटना घडली. तर येवलेवाडी स्मशानभूमीजवळ, सुखसागर नगर, अंबामाता मंदिर कोंढवा खुर्द, एनआयबीएम रोड या ठिकाणी अनेक घरात पाणी शिरले. हडपसर, आकाशवाणी जवळ झाडे पडली.

Local ad 1