Record break rain in Pune । पुण्यात 34 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद

पुणे : पुणे, नाशिक, धारशिवसह कोकणात (Pune, Nashik,Dharshiv, Konkan) मुसळधार, मुंबईत आज ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे. तर पुणे शहरासह जिल्ह्यात धुमाकूळ घातले असून, पावसाने गेल्या 34 वर्षांतील विक्रम मोडले आहेत. पुण्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस झाला आहे. संपूर्ण शहरात धुवाँधार पाऊस पडल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. (Record break rain in Pune ; The lowest rainfall in 34 years)

 

MH Times Exclusive News । मराठवाड्यात महाविकास आघाडीला ३२ विधानसभा मतदार संघात आघाडी

मागील नऊ दिवसांत 209 मिमीपावसाची नोंद झाली आहे. या पूर्वी जून 2019 मध्ये 74 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर 8 जून 2024 लोहगावात 139.8 तर शिवाजीनगरात 117 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात इंदापूरमध्ये 110 मि.मी. पावसाची नोंद झाली. पहिल्यास पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पाणी शिरले. पहिल्याच पावसात पुणे पूर्णपणे तुंबले होते. यामुळे लोकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. (Record break rain in Pune; The lowest rainfall in 34 years)

 

आज ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

पुण्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे.

24 तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस

शिवाजीनगर : 119.1 मिमी
इंदापूर : 110 मिमी
वडगावशेरी : 92.5 मिमी
पाषाण 79.3 मिमी
एनडीए  71.5 मिमी
तळेगाव ढमढेरे : 60 मिमी
हवेली 54.5 मिमी
बारामती 51.20 मिमी
हडपसर 45 मिमी
मगरपट्टा  43 मिमी
दौंड 35.5 मिमी

आज मुंबईत मुसळधार पाऊस

नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने राज्यात 6 जूनला प्रवेश केला होता. त्यानंतर रविवारी मान्सूनचे मुंबईत आगमन झाले. त्यामुळे रविवारी संध्याकाळपासून मुंबई, ठाणे आणि आजुबाजूच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस कोसळला आहे. सोमवारीही मुंबईत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Local ad 1