...

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात २६ रस्ते बंद ; ६,५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात

वाहतुकीस बंद असलेले प्रमुख रस्ते 

पुणे, दि. १९ जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शुक्रवार, २० जून रोजी पुणे शहरात होत असून, यानिमित्त शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. वाहनचालकांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा व पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. (palkhi 2025 pune traffic diversion route police) या पत्रकार परिषदेस पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त अमोल झेंडे, डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस निरीक्षक सुनील गवळी उपस्थित होते.

 

palkhi sohala 2025 । पुण्यात पालखी आगमनाआधी PMC मध्ये बैठकींचा मारा

 

भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक विभागाने विशेष नियोजन केले असून, शहरातील २६ प्रमुख रस्ते शुक्रवार सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.

 

वाहतुकीस बंद असलेले प्रमुख रस्ते 

रेंजहिल्स चौक ते संचेती चौक (गणेशखिंड रस्ता), खंडोजीबाबा चौक ते वीर चापेकर चौक (फर्ग्युसन रस्ता). गाडगीळ पुतळा चौक ते स. गो. बर्वे चौक (छ. शिवाजी रस्ता), आपटे रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, शनिपार चौक, सेवासदन चौक, नेहरू चौक, सोन्या मारुती चौक, हमजेखान चौक, देवजी बाबा चौक, रामोशी गेट ते पालखी विठोबा मंदिर, संत कबीर चौक ते चाचा हलवाई चौक हे मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. संपूर्ण यादी आणि पर्यायी मार्गांची माहिती https://diversion.punepolice.gov.in/ या लिंकवर उपलब्ध आहे.

 

 बंदोबस्ताचे ठळक मुद्दे

  • ६,५०० पोलिसांचा बंदोबस्त: गर्दीचे नियंत्रण, रस्ता सुरक्षेसाठी विशेष तैनाती
  • सीसीटीव्ही यंत्रणा: पालखी मार्गावर कडक नजर
  • भाविक सुरक्षेला प्राधान्य: वारकऱ्यांसाठी शौचालये, पाणी, डागडुजीचे आदेश
  • गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र पथक: चोरी व अनुशासनबाह्य प्रकारांवर लक्ष
  • ध्वनिवर्धक प्रणालीचा वापर: भाविकांसाठी सूचना प्रसारण

 

 

 

Local ad 1