Video : कोसळलेला पूल आणि कोसळलेली जबाबदारी : कुंडमाळा पूल कोणत्या विभागाचा ?
आतापर्यंत चौघांचे मृतदेह सापडले
पिंपरी. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात कुंडमाळा गावाजवळील इंद्रायणी नदीवरील एक जुना पूल रविवारी दुपारी कोसळला. या भयावह घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, काही जण गंभीर जखमी व काही अद्याप बेपत्ता आहेत. पुलावरून पायी चालणारे पर्यटक आणि दुचाकीस्वार थेट नदीत कोसळल्याने हाहाकार माजला. घटनेमुळे शेलारवाडी आणि कुंडमाळा गावांचा परस्पर संपर्क पूर्णपणे तुटला आहे. (kundmala bridge collapse maval pune 2025)
‘पुणे मॉडेल’ उपक्रमाची सुरुवात : शिक्षण आणि आरोग्य विकासाची नवी दिशा !
ग्रामस्थांची मागणी होती दुर्लक्षित; प्रशासनावर संताप
स्थानिक रहिवासी महेश शेलार यांनी सांगितले, “पूल कित्येक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत होता. आम्ही अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार केली, पण कोणीच दखल घेतली नाही.”
कर्जमाफीचा सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर १६ जूनपासून पाणी त्याग आंदोलन – बच्चू कडू यांचा इशारा
जुना पूल, नवे संकट
इंद्रायणी नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने 1995 मध्ये लोखंडी पूल उभारला होता. नंतर त्यावर सिमेंट-कॉंक्रिटची परत चढवण्यात आली होती. पावसाळ्यात या भागात पर्यटकांची वर्दळ वाढत असते. रविवारी झालेल्या दुर्घटनेच्या वेळी ही अनेक पर्यटक पूलावर फोटो घेत होते. (kundmala bridge collapse maval pune 2025)
घटनास्थळी कोलाहल आणि आक्रोश
घटनेच्या वेळी पुलावरून दोन गटांत वाद सुरू होता. दोन्ही बाजूंनी दुचाकीस्वार चढल्याने गर्दी झाली होती. तेवढ्यात अचानक पुलाचा मधला भाग तुटून खाली कोसळला. काही जण थेट नदीत पडले. एक नातेवाईक ओरडत होते, “माझा मुलगा, सून आणि नातू पुलावर होते… ते अजून सापडलेले नाहीत… त्यांना शोधा!” या हाकांनी संपूर्ण परिसर थरारला. (kundmala bridge collapse maval pune 2025)
बचावकार्यात अडथळे; ढाचा हटवणे मोठे आव्हान