...

indrayani pool collapse update। मावळात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला ; दोघांचे मृत देह सापडले, अनेक जण बेपत्ता ?

आमदार सुनील शेळके यांनी घटना स्थळावरून दिली माहिती

indrayani pool collapse update । मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल रविवारी (१५ जून) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून २५ ते ३० पर्यटक नदीत वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही दुर्घटना पर्यटनाच्या गर्दीने आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडल्याचं बोललं जात आहे. (pune maval indrayani pool collapse june 2025)

 

zilha parishad nivadnuk 2025। अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक, सिंधुदुर्ग सर्वात कमी जिल्हा परिषद गट ; तुमच्या जिल्ह्यात किती गट वाढले

प्रत्यक्षदर्शी च्या माहितीनुसार, रविवार असल्याने पुलावर मोठी गर्दी होती. काही पर्यटकांनी दुचाकी वाहने पुलावर नेल्याने पूल ओव्हरलोड झाला. याचवेळी अचानक पुलाचा काही भाग तुटून अनेक पर्यटक थेट नदीत कोसळले. पुलावर सुमारे ५० हून अधिक लोक उपस्थित होते.  स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी 2 मृतदेह बाहेर काढल्याचे जाहीर केले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

pune maval indrayani pool collapse june 2025

    pune maval indrayani pool collapse june 2025

 

गेल्या दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला होता. त्यामुळे पूल आधीच कमकुवत झाला असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि NDRF पथक दाखल झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Local ad 1