एअर इंडिया विमान अपघात : 242 पैकी 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू, एकमेव प्रवासी बचावला
उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले
अहमदाबाद : एअर इंडियाच्या अहमदाबादहून लंडन गॅटविक कडे जाणाऱ्या AI171 या विमानाला भीषण अपघात झाला. 12 जून 2025 रोजी दुपारी 1:38 वाजता 12 वर्ष जुन्या बोईंग 787-8 विमानाने उड्डाण घेतले होते. विमानात एकूण 242 प्रवासी व कर्मचारी होते. उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. या अपघातात 241 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, केवळ एक प्रवासी बचावला आहे. बचावलेला प्रवासी भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक असून, (अहमदाबाद लंडन एअर इंडिया क्रॅश) त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (air india flight ai171 crash 2025 )
PMC निवडणूक 2025 : नवीन प्रभाग रचना, नगरसेवकांच्या जागा कमी, दिवाळीनंतर मतदान?
एअर इंडिया विमान अपघात 2025 : प्रवाशांमध्ये 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 7 पोर्तुगीज नागरिक आणि 1 कॅनडियन नागरिकांचा समावेश होता. एअर इंडियाने या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत आहे. विशेष मदतकार्य करणारी टीम अहमदाबादला दाखल झाली आहे.एअर इंडिया या दुर्घटनेच्या चौकशीसाठी संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहे. तसेच प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी विशेष हेल्पलाईन क्रमांक देखील जाहीर करण्यात आले आहेत. (
Air India Flight AI171 Crash Marathi News)
- भारतातून कॉलसाठी: 1800 5691 444
- भारताबाहेरून कॉलसाठी: +91 8062779200