...

हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर थेट एसटी सेवा सुरु ; आयटी कर्मचाऱ्यांना वीकेंडला दिलासा

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वीकेंडला घरची वाट सोपी होणार

पुणे | प्रतिनिधी

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क आणि औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता त्यांना गावी जाण्यासाठी थेट एसटी सेवा उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर अशी वीकेंड (MSRTC weekend service) विशेष एसटी सेवा सुरु केली आहे. (हिंजवडी ते छत्रपती संभाजीनगर एसटी सेवा) ही सेवा खास करून शुक्रवारी गावी जाणारे आणि सोमवारी परत येणारे कर्मचारी लक्षात घेऊन सुरु करण्यात आली आहे. शिवाजीनगर एसटी आगारातून ही सेवा चालवण्यात येणार आहे. (hinjewadi to chhatrapati sambhajinagar bus service )  

पुण्यात ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात कोथरूड आघाडीवर !

 

बससेवेचे वेळापत्रक

मार्ग दिवस वेळ
हिंजवडी आयटी पार्क फेज-3 → छत्रपती संभाजीनगर दर शुक्रवारी सायंकाळी 6:00 वाजता
छत्रपती संभाजीनगर → हिंजवडी आयटी पार्क फेज-3 दर सोमवारी पहाटे 4:30 वाजता

 

🎟️ तिकीट दर:
पूर्ण तिकीट: ₹968

अर्धे तिकीट: ₹511

 

🙌 कर्मचार्‍यांना मोठा दिलासा
या सेवेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वीकेंडला घरची वाट सोपी होणार आहे. कामावरून थेट गावी जाणे आणि पुन्हा वेळेत कार्यालयात पोहोचणे ही गरज MSRTC ने ओळखून ही योजना सुरु केली आहे. ही सेवा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा महामंडळाने व्यक्त केली आहे. (वीकेंड एसटी बस पुणे)

 

Local ad 1