...

पुण्यात पाळीव कुत्र्यांसाठी स्वतंत्र पार्क ! खराडीत प्रस्ताव अंतिम टप्प्यात

पुणे .हैदराबादच्या धर्तीवर डॉग पार्क (pune kharadi dog park plan) उभारण्याची योजना असून, पुणे महापालिकेने खराडी येथील सर्वे क्रमांक 25 आणि 26 मधील जागेवर स्वतंत्र ‘डॉग पार्क’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील काही निवडक शहरांप्रमाणेच पुण्यातही आता श्वानांसाठी सुसज्ज आणि सुरक्षित पार्क उपलब्ध होणार आहे. (A separate park for pet dogs will be built in Pune)

 

 

JEE Advanced 2025: बाकलीवाल ट्युटोरियल्स चे टॉप 1000 मध्ये 16 विद्यार्थ्यांची घोडदौड

 

महापालिकेने याआधी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाजवळ आणि बाणेर येथे डॉग पार्कसाठी (Pune Dog Park) प्रयत्न केले होते. कात्रजमध्ये PPP (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर पार्क उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण यांच्याकडून परवानगी नाकारण्यात आली. बाणेर येथील जागेबाबतही पाहणी झाली, पण तिथेही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे आता महापालिकेने खराडीला प्राधान्य दिले आहे.

 

खराडीत सर्व्हे क्रमांक 25-26 मधील जागा तपासली जात असून, नुकतीच अ‍ॅमेनिटी स्पेस अधिकाऱ्यांसह बैठक पार पडली. महापालिकेने 3 एकर जागेची मागणी केली असली, तरी समोर खेळाचे मैदान असल्यामुळे प्रत्यक्षात 1 ते 1.5 एकर जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

 

डॉग पार्कमध्ये कोणकोणत्या सुविधा असणार?

कुत्र्यांसाठी जॉगिंग ट्रॅक

खेळण्याची जागा आणि मोकळे मैदान

डॉग पाँड (स्विमिंग पूल)

प्राथमिक दवाखाना व वैद्यकीय सुविधा

डॉग केअर अ‍ॅक्सेसरीज आणि खेळणी

नियमित सफाई व स्वच्छता व्यवस्था

पार्किंगची पुरेशी सुविधा

 

 

 

 

शहरात 8,000 नोंदणीकृत पाळीव कुत्री 

सध्या पुणे महापालिकेच्या हद्दीत सुमारे 8,000 नोंदणीकृत पाळीव कुत्रे आहेत. नागरिक आपल्या पाळीव मित्रांना मोकळ्या वातावरणात फिरवू शकतील, खेळवू शकतील यासाठी अशा सुविधांची नितांत गरज असल्याचं अनेक प्राणीप्रेमींनी व्यक्त केलं आहे.

 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंदे म्हणतात, “अनेकांसाठी कुत्रा हा केवळ पाळीव प्राणी नसून एक सच्चा मित्र व कुटुंबातील सदस्य असतो. त्यामुळे अशा सुविधा आवश्यक आहेत. देशातील काही शहरांमध्ये अशा उद्याने यशस्वीपणे सुरु असून, पुण्यातही त्याच पद्धतीने डॉग पार्क उभारण्यात येणार आहे.”

सध्या जागेच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. परवानगी मिळाल्यानंतर PPP तत्वावर प्रकल्प उभारण्यात येणार असून, हे पुणे शहरासाठी एक आदर्श प्रकल्प ठरेल अशी अपेक्षा आहे. महापालिकेच्या या पुढाकारामुळे प्राणीप्रेमींसाठी ही एक अभिनव सुविधा ठरणार आहे.

Local ad 1