...

मोठी बातमी : शताब्दी वर्षानिमित्त युवक काँग्रेस आरएसएसला देणार संविधान भेट – हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यंदा १०० वर्ष पूर्ण होत आहेत. या शताब्दी वर्षानिमित्त काँग्रेसकडून संघावर जोरदार टीका करण्यात आली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात आयोजित वार्तालाभ कार्यक्रमात संघाच्या कार्यपद्धतीवर आणि विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (rss 100 years youth congress constitution gift)

 

 

नांदेडमध्ये अतिवृष्टी बाधित शेतक-यांच्या बँक खात्यात सोमवारी प्रति गुंठा 85 रुपये जमा होणार

 

सपकाळ म्हणाले, “संघाच्या मुख्यालयात इतक्या वर्षांत कधीही झेंडा फडकावला गेला नाही. आता मात्र त्यांनी तो फडकवायला सुरुवात केली आहे. त्यांच्या रेशीमबाग येथील कार्यालयात भारतीय संविधान नसून मनुस्मृती ठेवलेली आहे. ती काढून संविधान लावावे, अशी आमची मागणी आहे. युवक काँग्रेसच्या वतीने त्यांना संविधान भेट देण्यात येणार आहे.”

 

 

ते पुढे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षपूर्तीनिमित्त नेमका २ ऑक्टोबर हा दिवस ठरला आहे आणि हाच दिवस महात्मा गांधी जयंतीचाही आहे. हा नियतीने खेळलेला खेळ आहे. गांधी यांच्या जयंतीच्या दिवशीच संघाचे शताब्दी वर्ष पूर्ण होणे हा एक संकेत आहे. पंचांगानेदेखील हे दाखवले आहे की आरएसएसच्या मानगुटीवर गांधी बसले आहेत.”

 

 

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम अ‍ॅक्टीव्ह मोडवर ; प्रशासनात मोठा खांदेपालट

 

सपकाळ यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही भाष्य केले. मात्र त्यांच्या भाषणाचा मुख्य भर आरएसएसच्या शताब्दी वर्षावर आणि त्यावरील टीकेवर होता.

 

Local ad 1