Rahul Gandhi : राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा

Gujarat News: मोदी आडनावावरून विनोद करणे राहुल गांधींना  (Rahul Gandhi) भोवले असून, सूरत न्यायालयाने दोन वर्षाचे शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर त्यांना जामिन मंजूर करण्यात आले. (Rahul Gandhi sentenced to two years)

 

 

राहुल गांधीनी  (Rahul Gandhi) कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरून टीका केली होती. राहुल गांधीविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली.  (Rahul Gandhi sentenced to two years)

 

राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 

 राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे.मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली  वरच्या कोर्टात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30  दिवसांचा वेळ दिला आहे. (Rahul Gandhi sentenced to two years)

 

 दरम्यान, काँग्रेस जेलभरो आंदोलन करणार आहे. राहुल गांधींची (Rahul Gandhi) प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Congress state president Nana Patole) दिली आहे. (Rahul Gandhi sentenced to two years)

 

2019 साली राहुल गांधी यांनी कर्नाटकच्या कोलारमध्ये ‘सर्व चोरांची आडनाव मोदीच कशी असतात’, असे राहुल प्रचारसभेत म्हणाले होते. त्याविरोधात गुजरातमधील एका भाजप आमदारांने पोलिसांत तक्रार केली होती.राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची प्रतिष्ठा खाली आणण्याचा त्यांचा आरोप होता. त्यावर आज सुरत सेशन कोर्टाने निकाल दिला आहे. (Rahul Gandhi sentenced to two years)

 

 

Local ad 1