राहुल गांधींना भेटलेला चंद्रकांत बनला ‘लॅपटॉपमॅन’

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi)  अनेकांना भेटून अडचणी जाणून घेत आहेत. . (Chandrakant became ‘Laptopman’ after meeting Rahul Gandhi) दरम्यान, लोहा तालुक्यात यात्रा असताना राहुल गांधी यांनी सर्वेश हाटणे आणि चंद्रकांत किरकन या दोन विद्यार्थ्यांना भेटून त्यांची अडचण समजून घेतली होती. या तिघांमध्ये झालेला संवाद त्यांनी नांदेड येथे झालेल्या जाहीर सभेत सांगितला. (Chandrakant became ‘Laptopman’ after meeting Rahul Gandhi)

 

 

 

एकाने सॉफ्टवेअर इंजिनियर तर दुसऱ्याने डॉक्टर व्हायचंय आहे, असे स्वप्न राहुल गांधींना सांगितले होते. मात्र, त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ते संगणक किंवा लॅपटॉप घेऊ शकत नाहीत. तसेच शाळेत संगणकही नसल्याचे  सांगितल्यानंतर काल सर्वेश हातनेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जुन खर्गे (Congress National President Malikarjun Kharge) यांनी राहुल गांधी यांच्या हस्ते तर चंद्रकांत किरकन या दहावीतल्या विद्यार्थ्याला नाना पटोले ( Nana Patole) यांच्या हस्ते लॅपटॉप देण्यात आले. हे दोघेही लोहा तालुक्यातील कौडगाव येथील रहिवासी असून दहावीत शिकत आहेत. (Chandrakant became ‘Laptopman’ after meeting Rahul Gandhi)

 

 

भारत जोडो यात्रेदरम्यान नांदेडच्या वाटेवर असताना राहुल गांधी यांना दोन मुलांनी सॉफ्टवेयर इंजिनियर व्हायचे बोलून दाखवले. पण आपण आजपर्यंत संगणक पाहिला व आपल्या शाळेतही नसल्याचे सांगितले. शाळेत संगणकच नाही तर या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण होणार हे जाणून राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुलाला संगणक भेट दिला. आता या मुलाच्या स्वप्नाला बळ मिळाले. पण ही एका मुलाची गोष्ट झाली, भारतातील प्रत्येक मुलाचे स्वप्न साकार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. (Chandrakant became ‘Laptopman’ after meeting Rahul Gandhi)

 

राजीव गांधींचा फोटो केला शेअर

राहुल गांधी यांच्या हस्ते मुलाला संगणक भेट देण्यात आले. तर दुसऱ्या मुलाल आज लॅपटॉप भेट देण्यात आले. या दोघांच्या फोटोसह राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत असलेला फोटो आणि राजीव गांधी लॅपटॉपवर काम करत असलेला फोटो शेअर करत हम गांधी है अशी टॅग लाईन असून, सपना और हकीकत अशी कॅप्टन देण्यात आली आहे.

Local ad 1