Ramadan News । रमजान महिना सुरु…कशी असते दिनचर्या जाणून घेऊया…

Ramadan News : पवित्र रमजान महिना (Ramadan month) हा मुस्लिम बांधवांसाठी (Muslim brothers) अत्यंत महत्वाचा मानला जातो.  रमजानचा पहिला रोजा (Ramadan fast) शुक्रवार (दि.24 मार्च) आहे.  रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांची दिनचर्या (Routine) कशी असते, त्याविषयी जाणून घेऊया.. (Let’s know the routine of the month of Ramadan)

 

 

रमजानचा महिना मुस्लिम बांधवांसाठी एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो. रमजानचे रोजे ठेवणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्यकर्तव्य मानले जाते. इस्लमिक कॅलेंडरचा (Islamic calendar)  नववा महिना म्हणजे रमजान. रमजानमध्ये केलेल्या उपासनेचे फळ इतर महिन्यांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे. (Let’s know the routine of the month of Ramadan)

 

Rahul Gandhi : राहुल गांधीना दोन वर्षाची शिक्षा

रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण दिवसभर काहीही न खाता पिता फक्त अल्लाहची इबादत करतात. यासोबतच तरावीहची नमाज आणि कुराण शरीफचे पठण केले जाते. रमजानमध्ये जकातीलाही अनन्य साधारण महत्व आहे. जकात म्हणजे आपण मेहनत करुन कमावलेल्या पैशातला काही भाग गरीबांसाठी किंवा गरजूंसाठी दान करणे. जकात हा इस्लामच्या पाच महत्वपूर्ण स्तंभांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. रमजानमध्ये उपवास, प्रार्थना आणि कुराण पठण यासोबतच जकात आणि फित्रा देण्याचेही विशेष महत्त्व आहे.

 

 

 

रमजान महिन्यात रोजा ठेवल्याने मिळणारं फळ अनेक पटींनी जास्त असतं आणि आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांची क्षमा यावेळेस अल्लाह देतो असा मुस्लिम बांधवांचा ठाम विश्वास आहे. (Let’s know the routine of the month of Ramadan)

 

 

 मुस्लिम बांधव दिवसभर काहीही न खाता पिता कडक रोजे, म्हणजेच उपवास करतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर रोजा सोडला जातो. ज्याला इफ्तार असे म्हटले जाते. इफ्तार च्या वेळेस आधी खजूर खाल्ला जातो आणि त्यानंतर विविध फळं खाऊन रोजा सोडला जातो. रात्री उपवास सोडल्यानंतर पुन्हा सकाळी सूर्योदयापूर्वी सहरी करुन पुन्हा दिवसभराच्या अत्यंत कडक रोजाला म्हणजेच उपवासाला सुरूवात होते. रोजे सुरू असताना मुस्लिम बांधवांना खोटे बोलणे, खोटे वागणं किंवा काहीही वाईट कृती करणे किंवा पाहाणे हे निषिद्ध आहे.

Local ad 1