मुंबई: बाळासाहेब असते तर शिवसेना फुटलीच नसती, उद्धव ठाकरे यांच्यामुळेच मी शिवसेनेतून बाहेर पडलो. त्यांनाच कंटाळून अलिबाबा 40 (मला चोर म्हणता येणार नाही) जण शिवसेना सोडून बाहेर पडले अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी केली. (Important points of Raj Thackeray’s speech)
- अनेकांनी म्हटलं होतं की मनसे हा संपलेला पक्ष आहे…. जे बोलले त्यांची अवस्था काय झालीय असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. (Important points of Raj Thackeray’s speech)
- शिवसेना आणि धनुष्यबाण यावरुन जो वाद सुरू होता त्यामुळे वेदना होत होत्या, कारण लहानपणापासून शिवसेना अनुभवली. असंख्य लोकांनी घामातून उभी केलेल्या संघटनेची अवस्था अशी होताना वाईट वाटत होता. पक्ष संपवणारे हे विठ्ठलाभोवतीचे बडवे, तेच चार लोक शिवसेना संपवणार असं म्हणालो होतो. त्यावेळी बाहेर पडलो.
- शिवसेना म्हणजे शिवधनुष्य… बाळासाहेबांना सोडून कुणालाही झेपणार नाही याची कल्पना होती. एकाला झेपलं नाही, आता दुसऱ्याला झेपेल का नाही ते माहिती नाही असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला.
- सगळ्यांना फक्त महाबळेश्वरची घटना सांगितली जाते. त्या आधीचं लोकांना माहिती हवंय म्हणून सांगतोय. मी उद्धव ठाकरे यांना म्हणालो होतो की, तुला काय हवंय? मला फक्त प्रचारापुरतं बाहेर काढू नका… त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की ठिक आहे. त्यानंतर बाळासाहेबांच्या समोर त्यांना सगळं मिटल्याचं सांगितलं. पण त्यावेळी उद्धव ठाकरे आलेच नाहीत. त्यांना फक्त मी बाहेर जावं असं वाटतं होतंय
- नारायण राणे बाहेर गेलेच नसते, त्यांच्या मनात पक्ष सोडून जायचं नव्हतं. त्यावर मी त्यांना बाळासाहेबांना भेटायला जाणार होतो, पण उद्धव ठाकरे यांच्यामुळे आधी हो म्हणालेल्या बाळासाहेबांनी नंतर राणेंना भेट द्यायला नकार दिला. त्यामागे उद्धव ठाकरे यांचा हात होता. आज शिवसेनेची अवस्था वाईट झाली असून बाळासाहेब असते तर शिवसेना फुटली नसती असं राज ठाकरे म्हणाले.
- शिवसेना फुटल्यानंतर अलिबाबा आणि 40 चोर बाहेर गेले. महाराज सुरतेवरून लूट करुन महाराष्ट्रात आले… पण महाराष्ट्रातून लूट करून सुरतेला गेलेले हे पहिलेच. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, राज्यासाठी काम कर, उद्धव ठाकरे यांच्या मागे भाषणं देत फिरू नका असा टोला राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. कोर्टावर अवलंबून असलेलं सरकार मी पहिल्यांदाच पाहतोय. एकदा निवडणूक लावा, जे काय व्हायचं ते होऊन जावूदे असं ते म्हणाले.
- मला जावेद अख्तर यांच्यासारखे मुस्लिम हवेत, त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनाच खडे बोल सुनावले, त्यांच्यासारखे महाराष्ट्रातील मुस्लिम मला हवेत असं राज ठाकरे म्हणाले.
- मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मशिदीवरील भोंगे काढावेत. एक तर तुम्ही करा किंवा आमच्याकडे दुर्लक्ष करा, आम्ही ते काढतो असं राज ठाकरे म्हणाले. सोबत मनसे कार्यकर्त्यांवरील नोंद करण्यात आलेले गुन्हेमागे घ्या असेही ते म्हणाले.
- माहिमच्या समुद्रामध्ये दर्गा तयार करण्यात आला आहे. दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे. येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा असं आव्हानदेखील राज ठाकरे यांनी दिले.
- मुंबईच्या सुशोभिकरणासाठी 1700 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रात्री मुंबईत खांबावर लाईट्स दिसतात, त्यामुळे कळतच नाही की मुंबई आहे की डान्सबार आहे.