...

Pune Cricket Academy : बीसीसीआय दर्जाचा देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

पुणे : युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची अधिकृत घोषणा केली असून, उदयोन्मुख क्रिकेटपटूंकरिता ही एक मोठी संधी ठरणार आहे. ही अकॅडमी बीसीसीआय मानकांनुसार उभारण्यात येत असून, देशातील सर्वात मोठा खासगी क्रिकेट प्रशिक्षण प्रकल्प म्हणून ओळखली जाणार आहे. (puneet balan cricket academy pune launch)

 

क्रिकेटमधील वाढती स्पर्धा आणि भारतीय तरुणांमधील उत्साह लक्षात घेऊन पुनीत बालन यांनी या अकॅडमीची संकल्पना साकारली आहे. पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वीही विविध खेळांना प्रोत्साहन दिले आहे. आता या अकॅडमीद्वारे महाराष्ट्रातील नवोदित क्रिकेटपटूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

 

या अकॅडमीसाठी सिंहगड कॉलेज, वडगाव आणि लोणावळा येथील अत्याधुनिक मैदानांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी बीसीसीआय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतील. पुढील क्रिकेट सिझनपासून येथे बीसीसीआयच्या अधिकृत सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआय-प्रशिक्षित तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अकॅडमीसाठी प्रवेश प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू होणार असून, १५ जानेवारीपासून प्रत्यक्ष प्रशिक्षणास सुरुवात** होईल. ही पूर्णपणे प्रोफेशनल अकॅडमी असल्यामुळे प्रवेशसंख्या मर्यादित असणार आहे.

अत्याधुनिक सुविधा

या अकॅडमीमध्ये पावसाळ्यातही सराव सुरू राहावा यासाठी प्रत्येक मैदानावर इनडोअर ३ विकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. वर्षभर प्रशिक्षण व्हावे यासाठी तंत्रशुद्ध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

खेळाडूंकरिता काय असेल 

* सुसज्ज होस्टेल सुविधा
* जिम आणि फिजिकल फिटनेस ट्रेनिंग
* जलतरण तलाव
* स्पोर्ट्स कंडिशनिंग आणि फिटनेस कोचिंग
यामाध्यमातून खेळाडूंचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे.

महिला क्रिकेटपटूंना विशेष संधी

महिला खेळाडूंसाठी स्वतंत्र बॅचेस सुरू करण्यात येणार असून, मुलींना सवलतीच्या दरात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला क्रिकेटला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.

स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी

अकॅडमीतील खेळाडूंना पीबीजी ज्युडिशियल क्रिकेट क्लबच्या माध्यमातून विविध निमंत्रित स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी दिली जाणार आहे.
“‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची स्थापना उदयोन्मुख आणि गुणवंत खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. आधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून तरुण क्रिकेटपटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळेल आणि महाराष्ट्राचा नावलौकिक निश्चितच वाढेल.”
पुनीत बालन, मालक, पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी
Local ad 1