...

Pune excise raid: नवीन वर्षापूर्वी उत्पादन शुल्क विभागाचा धडाका; चाकणमध्ये ४२ लाखांचे परराज्य स्कॉच जप्त

Pune excise raid : पुणे | प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे व परिसरात मद्यविक्री आणि तस्करी वाढण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने करडी नजर ठेवली आहे. बनावट, परराज्य व कर चुकविलेल्या मद्याच्या विक्रीला आळा घालण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून पुणे विभागात जोरदार कारवाया सुरू आहेत. याच कारवाईचा भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाने चाकण परिसरात मोठी कारवाई करत हरियाणा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेले स्कॉच जप्त केले आहे. या कारवाईत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून ट्रक व चारचाकीसह सुमारे ४२.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार आणि अधीक्षक अतुल कानडे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

Pune Municipal Election 2025 : महाविकास आघाडीचे सूत्र ठरले, महायुतीत मात्र खिचाताणी कायम

 

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, खेड विभाग यांना मिळालेल्या माहितीनुसार दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी वाकी बु. गावाच्या हद्दीत नाशिक–पुणे महामार्गालगत हॉटेल चौधरी ढाब्यासमोर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अशोक लेलंड कंपनीच्या सहाचाकी ट्रक (क्र. HR 46 F 3034) व मारुती सुझुकी ब्रेझा (क्र. HR 20 AP 9228) आणि इर्टिगा कारची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान हरियाणा राज्य निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विविध ब्रँडच्या ६१० सीलबंद स्कॉचच्या बाटल्या आढळून आल्या. सर्व मद्यसाठा व वाहने जप्त करण्यात आली.

 

या प्रकरणात दीपक श्रीजगदीशचंद्र कुमार, विष्णू प्रेमकुमार, राजेंद्रकुमार अर्जुनसिंग, रमेशकुमार प्रभुसिंग आणि योगेश ईश्वरसिंग राजपूत (सर्व रा. हरियाणा) या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा क्र. ३८६/२०२५ नोंदविण्यात आला असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास निरीक्षक राजेंद्र दिवसे करत आहेत.

 

 

❓ प्रश्न–उत्तर (Q&A )

प्रश्न 1: ही कारवाई कुठे करण्यात आली?
उत्तर: पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील वाकी बु. गावाच्या हद्दीत.

प्रश्न 2: किती मद्यसाठा जप्त करण्यात आला?
उत्तर: एकूण ६१० सीलबंद स्कॉचच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

प्रश्न 3: जप्त मुद्देमालाची किंमत किती आहे?
उत्तर: सुमारे ४२.३० लाख रुपये.

प्रश्न 4: आरोपी किती आणि कुठल्या राज्यातील आहेत?
उत्तर: पाच आरोपी अटक करण्यात आली असून ते सर्व हरियाणा राज्यातील आहेत.

प्रश्न 5: कोणत्या कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे?
उत्तर: महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

Local ad 1