पुणे : पुण्यातील गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या उत्सवात डीजे सेवा पुरवणे आमच्यासाठी अभिमानाची बाब असली तरी, नियमांचे पालन करणारे डीजे व्यावसायिक अन्यायकारक कारवाईचे बळी ठरत आहेत, अशी खंत साऊंड अँड इलेक्टिकल्स जनरेटर असोसिएशन पुणे (Sound and Electricals Generator Association, Pune) यांनी व्यक्त केली. (pune dj professionals noise pollution rules)
पुण्यात पाणी संकट गडद? पाणी कपात चर्चेला PMC आयुक्तांचा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी नकार
पत्रकार परिषदेत अध्यक्ष बबलू रमजानी आणि कार्याध्यक्ष राजू कांबळे यांनी सांगितले की, काही उपनगरातील व राज्याबाहेरून येणारे व्यावसायिक नियम मोडून काम करतात. पण त्याऐवजी सरसकट सर्वच डीजे व्यावसायिकांना दोषी ठरवले जाते. आमचे सदस्य वर्षानुवर्षे नियम पाळून व्यवसाय करतात. तरीसुद्धा पोलिस प्रशासनाने आमची बाजू न ऐकता आम्हालाच जबाबदार धरले जाते, असे ते म्हणाले.
रमजानी यांनी स्पष्ट केले की, ध्वनी प्रदूषणासंबंधी जसे नियम डीजे व्यावसायिकांवर लागू होतात तसेच नियम ढोल-ताशा पथकांवरही लागू करावेत. नियमांमध्ये एकवाक्यता आणि सुसूत्रता आणल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही.
कार्याध्यक्ष राजू कांबळे म्हणाले, “अनंत चतुर्दशी मिरवणुकीत दोन्ही प्रकारचे ध्वनी रंगत आणतात. मात्र, कोणत्याही प्रकारचा ध्वनी कानठळ्या बसवणारा किंवा आरोग्यास अपायकारक असेल तर त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. प्रशासनाने सर्वांसाठी समान मापदंड ठरवावेत.”
पॅनकार्ड क्लब गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासंदर्भात प्रलंबित कार्यवाही पूर्ण करा – योगेश कदम
असोसिएशनने गणेश मंडळे, कलाकार आणि प्रायोजकांना आवाहन केले की, “सरसकट डीजे बंदी” हा निर्णय डीजे व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर गदा आणणारा ठरेल. प्रशासनाने नियमांचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांना पाठबळ द्यावे, अशी मागणी या परिषदेत करण्यात आली.