journalist protection act। नांदेड : राज्यात पत्रकार संरक्षण कायदा संविधान दिनापूर्वी, म्हणजेच २६ नोव्हेंबरपूर्वी लागू करावा, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हा सरचिटणीस राम तरटे यांनी दिला आहे.
Diwali vacation 2025। शाळांना १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान दिवाळी सुट्टी
राम तरटे यांनी ही मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण, तसेच डाॅ. अजित गोपछडे यांनाही पाठवली आहे.
राज्यात पत्रकारांवर होणारे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी तब्बल ४० वर्षांच्या संघर्षानंतर पत्रकार संरक्षण कायदा मंजूर करून घेतला होता, परंतु राज्य सरकारने सन २०१९ पासून या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे राजकीय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून पत्रकारांवर सतत हल्ले होत आहेत, पत्रकार भयभीत झाले असून देशाची लोकशाही धोक्यात आहे.
“देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि पत्रकारांना कायद्याने संरक्षण मिळावे यासाठी हा कायदा २६ नोव्हेंबरपूर्वी लागू करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करण्यात येईल. माझ्या जीवितास काही झाले तर त्याची जबाबदारी फक्त राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यावर असेल, असे राम तरटे यांनी म्हटले. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.