(Muslim reservation) मुस्लिम आरक्षणासाठी ॲड.प्रकाश आंबेडकरांनी दिला रस्त्यावर उतरण्याचा इशारा
मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी भाजपाने 26 जूनला चक्का जाम आंदोलन केले होते. आता मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 5 जुलैला सरकार विरोधात वंचित नेते ॲड. प्रकाश आंबेडकर मोर्चा काढणार आहेत. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. For Muslim reservation. Adv. Prakash Ambedkar warned to take to the streets
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. पण मुस्लिम आरक्षणबाबत आणखी निर्णय झाला नाही. सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी अजून मुस्लिमांना आरक्षण दिलं नाही. सरकारविरोधात येत्या 5 जुलैला विधानभवनावर भव्य मोर्चा काढणार आहोत. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीसह रजा आकदमी सोबत असणार आहेत. अशी माहिती ॲड. आंबेडकरांनी दिली. For Muslim reservation. Adv. Prakash Ambedkar warned to take to the streets
सध्या राज्यात कोव्हिडची तिसरी लाट येत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मोर्चा काढणार आहोत. मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण कोर्टाने मंजूर केल आहे. मात्र सरकार ते जाहीर केलं नाही, सरकार ते जाहीर करावं. अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. पदोन्नती आरक्षणाबाबत बाबत वाद सुरू आहे. एम्पिरिकल डाटा सरकारला जमा करावा लागेल. असे ॲड. आंबेडकर म्हणाले आहेत.