...

“निवडणूक असो वा नसो, स्वच्छता थांबत नाही ! पुण्यातील या मोहिमेची सर्वत्र चर्चा”

 

पुणे : स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा घडवण्याच्या उद्देशाने आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार पेठ–महात्मा फुले मंडई परिसरात राबविण्यात येत असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ निवडणूक काळातही अविरत सुरू आहे. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली. (mission swachh prabhag 25 pune election cleanliness)

 

‘कोऱ्या पाटीवर विकासाची अक्षरे लिहा, विरोधकांना कात्रजचा घाट दाखवा’ : एकनाथ शिंदे

 

 

प्रभाग २५ मधील स्वच्छतेच्या गंभीर समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा बाप्पु मानकर नियमित आढावा घेत आहेत. प्रचाराची धामधूम सुरू असतानाही नागरिकांकडून येणाऱ्या अस्वच्छतेविषयक तक्रारी, त्यांचे निराकरण आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची तपासणी केली जात आहे. तसेच स्वच्छता सेवकांच्या आरोग्याची विचारपूस करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

 

“पुण्यात उत्पादन शुल्क विभागाला हायकोर्टाचा दणका ! 

 

 

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करत हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. शनिवार पेठेतील रहिवासी जयेश पंडित म्हणाले, “निवडणूक आली की सर्व उपक्रम थांबतील असे वाटत होते. मात्र आमच्या भागात पाचव्यांदा ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ने स्वच्छता मोहीम राबवली आहे. पुढेही ही मोहीम सातत्याने सुरू राहील अशी ग्वाही बाप्पु मानकर यांनी दिली आहे.”

 

या मोहिमेअंतर्गत प्रभागातील अरुंद गल्ल्या, रस्ते आणि बाजार परिसर स्वच्छ करण्यात आले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कचरा योग्य ठिकाणी टाकावा यासाठी नागरिकांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत या अभियानातून तब्बल ८० टन कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहिती बाप्पु मानकर यांनी दिली.

 

निवडणुकीच्या काळातही नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ कसबा परिसरासाठी एक आदर्श उपक्रम ठरत आहे.

 

 

 

 

Local ad 1