...

MHADA Pune Lottery 2025 । पुण्यात परवडणारी घरे मिळवण्याची मोठी संधी ; म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

MHADA Pune Lottery 2025 । पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने तब्बल ४१८६ घरांच्या भव्य सोडतीची घोषणा केली आहे. या सोडतीत पंतप्रधान आवास योजना (२१९ घरे), म्हाडा गृहनिर्माण योजना (१६८३ घरे), १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना (८६४ घरे) आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहयोजना (३३२२ घरे) यांचा समावेश आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले की ही संपूर्ण सोडत प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्षपाती पद्धतीने पार पडणार आहे.

 

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयएम उतरणार

 

 

पारदर्शक सोडत प्रक्रियाया सोडतीची संपूर्ण प्रक्रिया निपक्षपाती व पारदर्शक रितीने पार पाडली जाईल, असा विश्वास पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.सर्वसामान्यांसाठी संधीया गृहयोजनेतून साधारण उत्पन्न गटातील नागरिकांपासून कमी व मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांनाही घर घेण्याची संधी मिळणार आहे. घरांच्या किमती तुलनेने परवडणाऱ्या ठेवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर अर्जदार या सोडतीसाठी सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

 

गामपंचायतपासून मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच – उदय सामंत

 

 

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन अर्जाची सुरुवात 

११ सप्टेंबर २०२५, दुपारी १२:३० पासून

शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२५, रात्री ११:५५ पर्यंत

ऑनलाईन अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख : ३१ ऑक्टोबर २०२५

यादी व सोडत कार्यक्रमप्राथमिक यादी : ११ नोव्हेंबर २०२५, संध्याकाळी ६ वा.दावा/हरकती दाखल करण्याची मुदत : १३ नोव्हेंबर २०२५, दुपारी १२ वा.

अंतिम यादी : १७ नोव्हेंबर २०२५, संध्याकाळी ६ वा.

सोडत कार्यक्रम : २१ नोव्हेंबर २०२५, दुपारी १२ वा.

 

 

Local ad 1