...

गामपंचायतपासून मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच – उदय सामंत

पुणे, “मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर ती चांगली बाब आहे. मात्र, ठाकरे बंधू असोत की इतर कोणीही, गामपंचायत, पंचायत समितीपासून थेट मुंबई महापालिकेत सत्ता महायुतीचीच येणार आहे,” असा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. ते पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

नांदेड पोलिसांचे ऑपरेशन फ्लश आऊट | अवैध रेती उपसा प्रकरणी 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

 

 

सामंत म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांचे नाणे खणखणीत आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी उठाव करून दाखवले आणि विधानसभा निवडणुकीत ते सिद्ध केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार असून त्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार घेतील.”

 

 

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये विविध पक्षांतील नेते, कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याचे सांगून सामंत म्हणाले की, “मी कोणाचेही पद काढून घेण्यासाठी आलो नाही, तर कार्यकर्त्यांना पद देण्यासाठी आलो आहे.” यावेळी शिवसेना शहरप्रमुख रवींद्र धंगेकर, प्रमोद भानगिर व रमेश कोंडे उपस्थित होते.

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एआयएमआयएम उतरणार

 

सामंत यांनी पुढे म्हटले की, “प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र राज्यातील निवडणुकीसाठी महायुतीचे तीनही पक्ष एकत्रच लढतील. ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा महायुतीला कोणताही फटका बसणार नाही. उलट ते बंधू एकत्रच संपणार आहेत.”

 

अजित पवार बैठकांना गैरहजर का?
अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता सामंत म्हणाले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही ठोस कारणाशिवाय बैठकांना गैरहजर राहत नाहीत. त्यांना घशाचा आजार असल्यामुळे त्यांनी सध्या शासकीय बैठकींना हजेरी लावलेली नाही, तसेच दौरेही रद्द केले आहेत. त्यामुळे इतर कोणताही गैरसमज होऊ नये.”

 

Local ad 1