पुणे. खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच (The real Shiv Sena belongs to Uddhav Thackeray.) असा दावा करणारे भाजमध्ये सहभागी झालेल्या माजी नगरसेवकांचे तोंड भाजप प्रदेशाध्यक्षांनी बंद करावे, आम्हांला ही बोलता येते. मात्र, आम्ही कधी बोलत नाही. भाजपकडून मनपा निवडणुकीत उमेदवारी मिळेल का ते पहा, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृवातील शिवसेनेवर टिका करण्याची त्यांची लायकी नाही, असे राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांनी असे बजावले आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या तयारी संदर्भात बैठकीनंतर आय़ोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Chandrashekhar Bawankule should shut the mouths of those former corporators – Uday Samant)
मराठी विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. या संमेलानाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत. यंदापासून लेखक मधु मंगेश कर्णिक आणि अभिनेता रॉतेश देशमुखल यांचा सत्कार केला जाणार आहे. पुण्यातील ठाकरे शिवसेना गटाचे पाच माजी नगरसेवकांनी माजपमधे प्रवेश केला आहे. जाताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. पण त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. भाजपमध्ये गेल्यावर तिकीट मिळेल का हे पहावे.
मराठी भषा कशी बोलू नये यासाठी त्यांना बोलवावे लागेल
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असून, त्यानंतर सर्वत्र प्रमाण मराठी भाषेचा आगृह धरला जात आहे. मात्र, शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut), भाजपचे मंत्री नितेष राणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाशिव खोत यांना मराठी भाषा कशी बोलली पाहिजे, या परिसंवादात निमंत्रित करणार आहात का, त्यावर बोलताना मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत म्हणाले, तुम्ही ज्यांची नावे घेत आहात, त्यांना मराठी भाषा कोशी बोलून नये, अशा परिसंवादात बोलवावे लागेल, असा नाव घेता टोला लगावला.
परिपत्रके मराठीतुन निघतील
राज्यातील विद्यापीठे आणि शिक्षण विभागातील परिपत्रके हे इंग्रजीमध्ये येत आहेत. त्यामुळे मराठी भाषाचे संवर्धन कसे होईल, असा प्रश्न सामंत यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, राज्यातील सर्व विद्यापीठे, शिक्षण आणि इतर सर्व विभागांना आपले परिपत्रक हे मराठीत काढले जावेत, यासाठी सूचना दिल्या जातील.
“त्या” पाच नगरसेवकांना कडक भाषेत समज द्या – शिवसेना
खरी शिवसेना ही ठाकरे यांचीच आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्यक्तिकेंद्रित राजकारण करत आहेत, असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 5 नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये केला. या पार्श्वभूमीवर, खवळलेल्या शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविला. यावेळी शिवसेनेचे उप शहरप्रमुख सुधीर कुरूमकर, प्रवक्ते अभिजित बोराटे, शिवसेना अनुसूचित जाती जमाती प्रमुख प्रदीप धिवार, कार्यालय प्रमुख सुधीर जोशी आदी उपस्थित होते. “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायम लोकाभिमुख भूमिका घेणारे नेते आहेत. असे असताना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांकडून त्यांच्यावर व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा आरोप करणे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. संबंधित नगरसेवकांना भाजप नेत्यांनी कडक भाषेत समज द्यावी, यासंदर्भात आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी करणार आहोत.” अशी भूमिका स्पष्ट करत शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.