...

आठवडाभर पावसाचा महाष्ट्रात मुक्काम ! ; पावसाचा जोर वाढणार

सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

पुणे : बंगालच्या उपसागरावर २४ सप्टेंबरला एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असून, त्याचा प्रभाव थेट महाराष्ट्रावर २८ सप्टेंबरपर्यंत जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या हवामान बदलामुळे राज्यभर पावसाचे प्रमाण वाढणार असून, ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत तरी महाराष्ट्रातून मान्सून माघार घेणार नाही, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.

 

H-1B visa fee hike। “ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय: एच-1B व्हिसासाठी तब्बल $1 लाख फी”

 

 

हवामानाचा तपशीलवार अंदाज

२२ ते २५ सप्टेंबर : राज्यातील अनेक भागांमध्ये दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
२६ सप्टेंबर : विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिणेकडील भागांत पावसाची तीव्रता वाढणार आहे.
२७ सप्टेंबर : विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता.
२८ सप्टेंबर : राज्याच्या पश्चिमेकडील भागांत पावसाचा जोर कायम राहील.

 

मान्सून आणखी काही दिवस सक्रिय

या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत तरी महाराष्ट्रातून मान्सून माघार घेणार नाही, असे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

 

 

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या सूचना
1. काढणी केलेल्या पिकांचे पावसापासून संरक्षण करावे.
2. पिके व भुसभुशीत धान्य सुरक्षित जागी साठवून ठेवावे.
3. पुढील शेतीकामांचे नियोजन हवामान अंदाज लक्षात घेऊन करावे.
4. जनावरांच्या खाद्य व पाण्याचा योग्य साठा करून ठेवावा.

 

 

नागरिकांसाठी आवाहन

या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढणार असल्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. नाल्याजवळ किंवा नदीकाठावर जाण्याचे टाळावे. हवामान खात्याचे अद्ययावत अंदाज व इशारे लक्षपूर्वक पाळावेत.

 

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक २२, २५ व २६ सप्टेंबर २०२५ या तीन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दि. २२ व २५ सप्टेंबर २०२५ हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा व दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी.
या गोष्टी करा : विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.
या गोष्टी करु नका : आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

 

 

 

 

Local ad 1