Maharashtra SSC Result 2026: इयत्ता १० वीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर होणार ; येथे पाहा निकाल 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेचा निकाल शुक्रवार, दिनांक ०८ मे २०२६ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य परीक्षा मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना विषयानिहाय गुणांसह संपूर्ण निकाल ऑनलाईन उपलब्ध होणार असून त्याची प्रिंटआउट घेण्याची सुविधाही देण्यात आली आहे. तसेच डिजीलॉकर (DigiLocker) अ‍ॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गुणपडताळणी व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया
निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती व पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ९ ते २३ मे २०२६  या कालावधीत अर्ज करता येणार आहे. अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून ती मिळाल्यानंतर पाच कार्यालयीन दिवसांच्या आत अर्ज करणे बंधनकारक राहील, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

आधिकारिक वेबसाइट्स
* https://results.digilocker.gov.in
* https://results.digilocker.gov.in
* https://mahahsscboard.in
* https://mahahsscboard.in
* https://sscresult.mkcl.org
* https://sscresult.mkcl.org

Local ad 1