...

खडकवासला धरणातून वाढता विसर्ग : पुणे शहरात सतर्कतेचा इशारा

रात्री साडेनऊ वाजता 15 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

पुणे, 19 जून 2025 | पुणे शहरातील खडकवासला धरणातून गुरुवारी (19 जून) दिवसभरात पाच वेळा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरण क्षेत्रात वाढलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे विसर्गात सातत्याने बदल केला जात असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाने सांगितले की, पाण्याच्या येव्या प्रमाणात विसर्गात आणखी बदल (कमी अथवा जास्त) होण्याची शक्यता आहे.

 

palkhi sohala 2025। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज

 

💧 दिवसभरातील विसर्गाचा तपशील

🕐 दुपारी 1 वाजता : विसर्गाची सुरुवात 2,000 क्युसेक्सने झाली.
🕕 सायंकाळी 6 वाजता : विसर्ग वाढवून 4,345 क्युसेक्स करण्यात आला.
🕖 सायंकाळी 7 वाजता : विसर्ग वाढवून 8,734 क्युसेक्स करण्यात आला.
🕤 रात्री 9.30 वाजता : 12,434 क्युसेक्स विसर्ग सुरु झाला.
🕚 रात्री 11 वाजता: विसर्ग वाढवून 15,092 क्युसेक्स करण्यात आला.

 

 

पुणे महापालिकेत टीडीआर घोटाळा; नगरविकास विभागाने मंजूर प्रस्तावांची माहिती मागवली  

 

 

 

नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा

पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेसह प्रशासनाने नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात नागरिकांनी उतरू नये, तसेच यंत्रसामग्री, जनावरे इत्यादी तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. आषाढी वारीनिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल होत आहेत. भाविकांनी नदीपात्रात न जाण्याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. संबंधित यंत्रणांनी योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवावी, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षाचे सनियंत्रण अधिकारी श्वेता कु-हाडे यांनी सांगितले.

 

 

 

Local ad 1