बिग ब्रेकिंग ; जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात; आठ ठार, पाच गंभीर जखमी
स्वीफ्ट डिझायर कार ढाब्यासमोर उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोवर आदळली
पुणे : जेजुरी मोरगाव रोडवर किर्लोस्कर कंपनीजवळील श्रीराम ढाब्याजवळ बुधवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. पुण्याहून मोरगावकडे जाणारी स्वीफ्ट डिझायर कार (MH 42 AX 1060) ही कार, ढाब्यासमोर उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला (MH 12 XM 3694) जोरात धडकली. त्या वेळी टेम्पोमधून साहित्य खाली उतरवले जात होते. (jejuri road accident 8 dead june 2025)
Mhada Lottery 2025 Pune : परवडणाऱ्या सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू
धडक इतकी जोरदार होती की, स्वीफ्ट कारने बाजूला उभ्या असलेल्या दुसऱ्या कारलाही (MH 12 TK 9483) धडक दिली. या अपघातात टेम्पोमधील व रस्त्यालगत उभ्या असलेल्या लोकांसह कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. एकूण आठ जण ठार झाले असून, दोन मुले, एक महिला आणि दोन पुरुष असे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ओंकार कदमवर अखेर गुन्हा दाखल | PMC महिला डॉक्टर छळ प्रकरणात पोलिसांची कारवाई