विधानसभेच्या आमदारांना किती पगार ? बाबो…आकडा वाचून धक्का बसेल !

पुणे : निवृत्तीवेतन द्या, (Pension) अशी मागणी सातत्याने सरकारी नोकरदार करत आहेत. हे नोकरदार प्रत्येकवेळी माजी आमदारांना (Former MLA) मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाचा दाखला देतात. मात्र, विद्यमान विधानसभेच्या आमदारांना किती पगार मिळतो, हे माहिती आहे का ? माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून आमदारांना मिळणार वेतन आणि भत्ते ही रक्कम पाहिल्यास धक्का बसल्याशिवाय रहाणार नाही. (How much salary to MLAs? You will be shocked to read the figure!)

 

 

माजी आमदारांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाची चर्चा सातत्याने होत असते. एकदा आमदार म्हणून विधानसभेत गेले की, निवृत्ती वेतन घेण्यास पात्र होत असतात. मात्र, दुसरीकडे 2005 पासून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले. तेव्हापासून कर्मचारी संघटनांची जुनी निवृत्तीवेतन योजना पुन्हा पुर्ववत सुरु करावी, अशी मागणी आहे. मात्र, निवृत्तीवेतन देण्यासाठी पैसे नाहीत, असे सरकारकड़ून सांगितले जाते. तर दुसरीकडे आमदारांनी आपल्या स्वतःच्या वेतनात वाढ करुन घेतले. यासाठी पैसे आले कुठून असा सवाल विचारला जातो. मात्र, त्याचे उत्तर दिले जात नाही. विशेष म्हणजे आमदारांच्या वेतन वाढीचा प्रस्ताव एक मताने मंजूर केला जातो. (How much salary to MLAs? You will be shocked to read the figure!)

 

 

सावंतवाडी तालुक्यातील संकेत नेवगी यांनी सध्या आमदारांना मिळणारे वेतन आणि भत्ते याविषयी माहिती अधिकारी अधिनियम 2005 नुसार माहिती मागितली होती. विधान भवन कडून माहिती देण्यात आली.  ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्या पत्रानुसार  आमदारांचे एक लाख 82 हजार 200 रुपये हे मुळ वेतन आहे. सध्या महागाईचा आगडोंब उडाला असून, त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे. महागाईचा विचार करुन आमदारांना तब्बल 34 टक्के (69 हजार 948 रुपये ) महागाई भत्ता दिला जातो. त्याबरोबरच दूरध्वनी सेवेसाठी आठ हजार रुपये, स्टेशनरी-टपाल सुविधा आणि संगणक चालकासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये असे एकूण दोन लाख 72 हजार 148 रुपयांची रक्कम आमदारांना दरमहा मिळते. तर त्यातील व्यवसाय कर 200 रुपये आणि स्टॅम्पसाठी एक रुपये असे 201 रुपये कपात केले जातात. (How much salary to MLAs? You will be shocked to read the figure!)

Local ad 1