कोल्हापुरात लागला फ्लेक्स । ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं..’

पुणे. लोकसभा निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि शरद पवार तसेच अजित पवार (Sharad Pawar, Ajit Pawar) यांचे दोन गट पडले. अजित पवार सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्ष चिन्हावर ही ताबा मिळाला. या निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीसोबत निवडणूक लढवली. तर काँग्रेस, शिवसेनेसोबत (Congress, ShivSena) शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली. बारामतीमध्ये तर सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाल्यामुळे पवार वि. पवार असा सामना रंगला होता. त्यामुळे शरद पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. यात सुप्रिया सुळे यांनी वहिनी सुनेत्रा पवार (Supriya Sule, Sunetra Pawar) यांचा पराभव केला आहे. त्यावर आता कोल्हापुरात एक फ्लेक्स चर्चेत आले आहे. त्यावर ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं..’असा फ्लेक्स लावण्यात आले आहे. (Sharad Pawar’s worker planted flex in Kolhapur, targeted Ajit Pawar)

 

 

बारामतीसह राज्यातील १० पैकी 8 जागांवर जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला. तर अजित पवार यांच्या पक्षाला अवघी १ जागा जिंकता आली. या निकालानंतर कोल्हापूरमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवारगटाच्या कार्यकर्त्यांनी खास कोल्हापुरी शैलीत पवारांची स्तुती करत अजित पवार आणि विरोधकांना जोरदार टोला हाणला आहे. बॅनरबाजीतून (Flax in Kolhapur) अजित पवार यांना चांगलाच चिमटा ही काढण्यात आला आहे.

 

कोल्हापूरमधील दाभोळकर चौक परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ‘सुजल्यावरच कळतंय शरद पवारांनी मारलय कुठं..’ ही अवघी एक ओळ या बॅनरवर आहे, पण त्यातचा निशाणा बरोब्बर लागला आहे. याच बॅनरवर शरद पवार यांचा फोटो आणि त्यांच्या पक्षाचे चिन्ह असलेली तुतारी हा फोटोही असून या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

 

Local ad 1