Parbhani ACB Trap । 10 हजार रुपयांची लाच घेणार ग्रामविकास अधिकारी अटक

Parbhani ACB Trap जिल्हा नियोजन समितीच्या गावात केलेल्या सीमेंट रोड आणि नालीचे काम केले होते. त्याच्या बिलाचा धनादेश देऊन आरटीजीएस फार्मवर सही आणि शिक्का देण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांने आधी 20 हजार रु़पयांची मागणी करुन 10 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामविकास अधिकाऱ्याला परभणी लाचलुचपथ प्रतिंधक  विभागाच्या पथकाने अटक केली. (Village development officer arrested for taking 10 bribes)

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार  ग्रामपंचायत पोहंडूळ  ता. मानवत, जि. परभणी चे अधिकारी मधुकर बाबुराव गोरे (वय 52 वर्षे, ग्रामविकास  अधिकारी (वर्ग 3)  असे अटक केलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.

ग्रामपंचयात पोहंडूळ येथे डिपीसीच्या निधीतून एका 42 वर्षीय कंत्राटदाराने नाली आणि सीसी रस्ता तयार केला होता. ६ मे रोजी केलेल्या कामाचे धनादेश मिळविण्यासाठी आरोपी  मधुकर गोरे यांची भेट घेवून धनादेश घेतला. त्यानंतर सदर धनादेश तक्रारदार यांचे बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या RTGS फॉर्मवर आलोसे मधुकर गोरे यांची सही व शिक्का आवश्यक असल्याने सदरचे सही व शिक्का देण्यासाठी  गोरे यांने तक्रारदार यांना 20,000 रुपये लाच मागितली. सदर लाचेची रक्कम न दिल्यास आलोसे  गोरे हे RTGS फॉर्मवर सही व शिक्का देणार नाही या भितीने तक्रारदार यांनी त्यांच्या कडे असलेले 4,000 रूपये गोरे यांना लागलीच दिले. त्यानंतर उर्वरित 16,000 रूपये RTGS फॉर्म वर सही व शिक्का घ्यायचे वेळी आणून देण्यास सांगितले. सदर रक्कम ही लाच असल्याने व तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी  दिनांक 13/05/2024 रोजी एसीबी परभणी कार्यालयात तक्रार दिली. त्याच दिवशी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना मिळालेला धनादेश त्यांचे बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या RTGS फॉर्मवर आलोसे मधुकर गोरे यांनी सही व शिक्का देण्यासाठी तडजोडी अंती 10,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.  त्यावरून ५ जून रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान  गोरे यांनी तक्रारदार यांचेकडून 10,000 रुपये लाच रक्कम स्वीकारली आहे. त्यावेळी आलोसे मधुकर गोरे यांना लाचेच्या रकमेसह लागलीच ताब्यात घेण्यात आले आहे. या संबंधाने पो.स्टे.मानवत येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .

दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका कधी मिळणार ; जाणून घ्या

अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेडचे पोलीस अधीक्षक  डॉ.राजकुमार शिंदे, अँटी करप्शन ब्युरो, परभणीचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनात सापळा व तपास अधिकारी  अँटी करप्शन ब्युरो,परभणीचे  पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे यांच्या पथकाने कारवाई केली.
,

Local ad 1