पुणे, रमजान ईद अर्थात Eid-ul-Fitr निमित्त 21 मार्च रोजी शहरातील विविध ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज अदा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन Pune Traffic Police यांनी विशेष वाहतूक व्यवस्था लागू केली आहे. (eid-ul-fitr pune traffic diversion golibar maidan 2026)
वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार, Golibar Maidan परिसरात सकाळी 6 ते 11.30 या वेळेत (नमाज संपेपर्यंत) आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. अग्निशमन दल व रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.
प्रमुख वाहतूक बदल पुढीलप्रमाणे
भैरोबानाला चौक ते गोळीबार मैदान (सोलापूर रोड)
सकाळी 6 ते 11.30 दरम्यान वाहतूक वळविण्यात येईल. सोलापूरकडून स्वारगेट कडे येणारी वाहने भैरोबा नाला चौकातून डावीकडे वळून प्रिन्स ऑफ वेल्स रोड, लुल्लानगरमार्गे जातील. जड वाहनांना पुणे स्टेशनकडे प्रवेश बंद.
मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान हा मार्ग पूर्णपणे बंद राहील. सीडीओ चौक ते गोळीबार चौक – गरजेनुसार वाहतूक वळविण्यात येईल. लुल्लानगर कडून येणारी वाहने सीडीओ चौकातून डावीकडे वळवली जातील. खटाव बंगला चौकातून नेपियर रोडकडे उजवीकडे वळण्यास तात्पुरती परवानगी.
स्वारगेट ते सोलापूर रोड वाहतूक
सेव्हन लव्हज चौकातून वळवून सॅलिसबरी पार्क रोड – सीडीओ चौक – खटाव चौक मार्गे वळवली जाईल.
जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक
हा मार्ग पूर्णतः बंद राहील. पर्यायी मार्ग म्हणून पुलगेट डेपो – नेपियर रोड – खटाव बंगला मार्ग वापरण्याचे आवाहन.
लुल्ला नगर चौक ते गोळीबार चौक – जड वाहनांना प्रवेशबंदी राहील.

