Breaking news : ईडीचे पथक शिवसेनेचे खासदार संजय राऊत घरावर धडकले ; मी कधीही शिवसेना सोडणार नाही : संजय राऊत

मुंबई : गोरेगाव पत्राचाळ प्रकरणात (Goregaon Patra Chal case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सकाळपासून ईडीच्या दहा अधिकाऱ्यांचे पथक (ED team)
सकाळी सात वाजल्यापासून चौकशी करत आहे. (ED team raided Shiv Sena MP Sanjay Raut’s house)

 

 

पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून राऊतांना अनेकवेळा समन्स देऊनही ते ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहत नाहीत, असे सांगत ईडीचे पथक राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या घरी धडकले आहे. सध्या चौकशी सुरू असून, संजय राऊत, बंधू आमदार सुनील राऊत आणि कुटुंबातील सदस्य उपस्थितीत आहेत. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (ED team raided Shiv Sena MP Sanjay Raut’s house)

 

 

 

दरम्यान, ईडीचे पथक राऊत यांच्या घरी पोहोचल्याची माहिती बाहेर येताच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राऊत यांच्या घरासमोर दाखल झाले असून, जोरदार घोषणाबाजी करत आहेत. ही कारवाई जाणूनबुजून असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. राऊत यांच्यावर दबाव आणला जात आहे, आरोपही केला आहे. (ED team raided Shiv Sena MP Sanjay Raut’s house)

Local ad 1