डेंगीवरील उपचारात ऐतिहासिक पाऊल ; भारतात अंतिम चाचणी सुरु
सीरम इन्स्टिट्यूट डेंगीसाठी नवे औषध तयार करतंय
पुणे | डेंगी या डासांमुळे होणाऱ्या आजारावर लवकरच प्रभावी व परवडणारे औषध उपलब्ध होणार आहे. ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ व जिनिव्हा येथील ‘डीएनडीआय’ (Drugs for Neglected Diseases Initiative) या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये याबाबत सामंजस्य करार झाला आहे. डेंगीवरील मोनोक्लोनल अँटीबॉडी औषधाचा तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी सध्या भारतात सुरू असून, लवकरच ते बाजारात उपलब्ध होणार आहे. (dengue treatment serum monoclonal antibody trial)
सध्या डेंगीवर कोणतेही ठोस औषध किंवा लस नसल्याने लक्षणांनुसार उपचार केले जातात. भारतासह थायलंड, मलेशिया आणि ब्राझीलसारख्या देशांमध्येही चाचण्या सुरू असून, हे औषध डेंगीच्या चारही प्रकारांवर परिणामकारक आहे. (dengue treatment india serum monoclonal antibody trial)
कही खुशी कहीं गम..! पुण्यातील जिल्हा परिषद रचनेत मोठा बदल ; राजकीय हालचालींना वेग !
डॉ. प्रसाद कुलकर्णी (सीरम) यांनी सांगितले की, “हे औषध तयार करणे, पुरवठा व वितरण ही जबाबदारी सीरम इन्स्टिट्यूट पार पाडणार आहे. हे औषध भारत, ब्राझील व दक्षिण आशियात लाखो रुग्णांचे प्राण वाचवेल.” डॉ. कविता सिंग (डीएनडीआय) यांनी नमूद केले की, डेंगी ही हवामान बदलाशी निगडीत साथ असून, निदान, जनजागृती आणि कीटक नियंत्रण अत्यंत गरजेचे आहे.
भारतात डेंगीची वाढती स्थिती
दरवर्षी रुग्णसंख्या दुप्पटीने वाढते.
२०२३ मध्ये २.८९ लाख रुग्ण व ४८५ मृत्यू.
२०२५ च्या मार्चअखेरपर्यंत १२,००० हून अधिक रुग्ण नोंदले.
कही खुशी कहीं गम..! पुण्यातील जिल्हा परिषद रचनेत मोठा बदल ; राजकीय हालचालींना वेग !
डेंगीवर प्रभावी उपचारासाठी सीरम व DNDI चा करार, मोनोक्लोनल अँटीबॉडी औषध अंतिम चाचणी टप्प्यात; लवकरच बारात उपलब्ध होण्याची शक्यता. (dengue treatment india serum monoclonal antibody trial)