भामरागडमधील ४०० महिलांनी टाकले क्रांतिकारक पाऊल ; कुर्मा प्रथा न पाळण्याची घेतली शपथ   

पुणे : गडचिरोलीत आदिवासी समुदायात असणाऱ्या कुर्माप्रथेत सकारात्मक बदल व्हावेत यासाठी ‘समाजबंध’ सामाजिक संस्था प्रयत्न करत आहे. त्यासाठीएप्रिलमध्ये भामरागड तालुक्यातील 18 गावात पहिलं आठ दिवसीय निवासी शिबिर राबवले. त्यातील 14 गावांमध्ये हे दुसरे शिबिर राबवण्यात आले. या गावांतील 400 महिलांनी कुर्मा प्रथा (Kurma practice) न पाळण्याची घेतली शपथ घेतली आहे. (Revolutionary step of 400 women in Bhamragarh; He took an oath not to follow the custom of Kurma)

सत्याचे प्रयोग-२ हे शिबिर २३ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भामरागडमध्ये झाले. दिवाळीच्या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अक्षरशः जनरलच्या डब्यातून प्रवास करत १३ जिल्ह्यातून समाजबंधचे एकूण २५ कार्यकर्ते स्वखर्चाने शिबिरात सहभागी झाले होते. सात महिन्यांपूर्वी म्हणजे पहिल्या शिबिराच्या आधी कुर्माप्रथेमध्ये बदल करणं जितकं अवघड वाटत होतं तितकं ते नक्कीच नाही,  हे या शिबिरात समजलं. (Revolutionary step of 400 women in Bhamragarh; He took an oath not to follow the custom of Kurma)

कुर्माघर म्हणजे काय?

कुर्मा म्हणजे मासिक पाळीच्या काळात आदिवासी स्त्रीचे बाजूला बसणे. मात्र हे स्वत:च्या घरात नाही तर दूर नदीच्या काठी बांधलेल्या कुर्मा घरात… नावालाच घर… प्रत्यक्षात वर शाकारलेले छप्पर आणि भोवती गवत-चिखलाच्या भिंती अशी गावाने उभारलेली ती बसकी झोपडीच असते.
  •  खेळ, स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. मासिक पाळी आणि इतर सामाजिक विषयांवर निबंधलेखन, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धा आयोजित करत किशोर आणि युवांना बोलते करण्यात आले. या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करत महिला आणि किशोर यांची गावागावातून प्रभातफेरी काढण्यात आली. कुर्माप्रथेवर नेमकं भाष्य करणारे नाटक दिवाळीनिमित्त असणाऱ्या कार्यक्रमात गावातील मुलींनी सादर केले.

सहयोग सेतू या संस्थेने सर्व १००० कुटुंबांना देण्यासाठी दिलेळे बेसन लाडूही घरोघरी वाटण्यात आले. जवळपास ५०० युवक युवतींना कुर्मा व मासिक पाळीविषयी प्रश्न विचारून सर्वेक्षण ही करण्यात आले. त्यानुसार असे लक्षात आले की, कुर्माप्रथा बंद व्हावी असे सर्वांनाच वाटते, असा निष्कर्ष निघाला. परंतु, गावातील पंचा च्या भीतीने पुढाकार घ्यायला कोणी तयार होत नाही. म्हणून अशा परिवर्तनशील युवकांचे ‘युवा आरोग्य मंडळ’ स्थापन करून गावातील प्रश्नांवर त्यांच्यामार्फत एकजुटीने यापुढे काम केले जाणार आहे.
शेवटच्या दिवशी गावातील समाजबंधने नेमलेली आरोग्यसखी व इतर सक्रिय महिलांनी गावातील महिलांना कुर्माघरात ठेवावं कि घरी यावर चर्चा करण्यासाठी महिला सभा भरवली होती. काही गावात सुमारे १०० च्या आसपास स्त्री-पुरुष या सभांना उपस्थित होते हे चित्र फारच आश्वासक आहे. सभेस उपस्थित सर्वांसमोर पाळीच्या काळात कुर्माघरात न राहता घरी राहण्याबद्दल विचारणा केली. यावेळी काही गावातील पारंपरिक नेतृत्व/प्रतिष्ठित पुरुषांनी महिलांनी कुर्माघरात रहावं कि घरात कि अंगणात हे त्यांचं त्यांनी ठरवलं तरी आमची हरकत नसेल आणि आम्ही त्यासाठी कुणाकडून दंड घेणार नाही असे भर सभेत घोषित केले.
१४ गावातील जवळपास ४०० महिलांनी मी कुर्माघरात राहणार नाही अशी शपथ भर सभेत पुरुषांसमोर घेतली आणि स्वयं घोषणापत्रावर अंगठा/सही देखील केली. १०० हून अधिक पुरुषांनी देखील त्याला अनुमोदन देत त्यावर सह्या केल्या. परंतु, गावातील काही कार्यकर्त्यांचे अजिबातच ऐकून घेतले नाही. (Revolutionary step of 400 women in Bhamragarh; He took an oath not to follow the custom of Kurma)
“आतापर्यंत समाजबंधने काम केलेल्या १९ पैकी १० गावातील महिला, युवावर्ग आणि काही पुरुषही कुर्माप्रथेला मूठमाती देण्याच्या दिशेने वेगाने पाऊले टाकत आहेत; तर शेकडो महिला व मुली पाळीच्या काळात कुर्माघरात न राहता गुपचूप घरात राहत आहेत. याचाच अर्थ या प्रथेतील फोलपणा लोकांच्या ही हळूहळू लक्षात येत आहे. सातत्याने या विषयात काम करत राहिलं तर येत्या १० वर्षात भामरागड मधील परिस्थिती बदलेल याचा आम्हाला विश्वास आहे.” असं समाजबंधच्या प्रशिक्षक शर्वरी सुरेखा अरुण म्हणाल्या.
  • अजूनही महाराष्ट्रात कुर्माप्रथेसारखी अनिष्ठ प्रथा सुरु असणं, त्यातून कित्येक महिलांचे बळी जाणं, टोकाची अस्पृश्यता पाळली जाणं हे जितकं वाईट आहे त्याहूनही भयानक हा विषय मुख्य प्रवाही जगाला माहीतच नसणं हे आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन समाजबंध त्यात करत असलेल्या सकारात्मक हस्तक्षेपास शक्य झाल्यास आपल्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन बदलाचा हा Approach लोकांसमोर आणावा यासाठी खालील Post पाठवत आहे.
सचिन आशा सुभाष,
 7709488286
Local ad 1