बारामती, 28 जानेवारी 2026 : बुधवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ एक विमान अपघात झाला, ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे. सकाळी 8.10 मिनिटांनी मुंबईहून बारामतीकडे निघालेलं चार्टर विमान बारामती विमानतळावर लँड करत असताना नियंत्रण गमावले आणि जवळच्या शेतात कोसळले. अपघाताच्या गंभीरतेमुळे परिसरात भीती आणि गोंधळ पसरला. विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सुरक्षारक्षकांसह पायलट व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता. (baramati plane crash ajit pawar death)
मिळालेल्या माहितीनुसार विमानात एकूण 5 प्रवासी होते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिस आणि बचावकर्त्यांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून रेस्क्यू आणि बचावकाम सुरु केले आहे. प्राथमिक तपासात तिन्ही मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले असून, पुढील तपासासाठी ते जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत. या भीषण अपघातामुळे राज्यभरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन आणि विमान सुरक्षा विभागाने पुढील तपास सुरू केला आहे. मंगळवारी सकाळी बारामती विमानतळाजवळ व्हीएसआर (VSR) कंपनीच्या मालकीचे Learjet 45 (नोंदणी VT-SSK) विमान लँडिंगच्या वेळी अनियंत्रित झाले आणि नजीकच्या शेतात कोसळले.

