...

मेट्रोपासून बाजारहाटपर्यंत थेट कनेक्शन ; सनी निम्हण यांचा मास्टरप्लॅन !

 

पुणे : औंध–बोपोडी परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख प्रकल्प राबविण्याचा निर्धार भारतीय जनता पक्ष – रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे प्रभाग क्रमांक ८ मधील उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांनी व्यक्त केला. औंध रोड सोसायटी असोसिएशनच्या सभागृहात आयोजित नागरिक संवाद बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, तसेच युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड आणि सपना छाजेड उपस्थित होते. (aundh bopodi development sunny nimhhan metro shuttle riverfront)

 

 

 

निम्हण म्हणाले की, बोपोडी आणि बाणेर फाटा येथून जाणारे दोन मेट्रो मार्ग औंध–बोपोडी परिसरासाठी मोठी संधी आहेत. या मेट्रो स्थानकांचा लाभ प्रत्येक नागरिकाला सहज मिळावा यासाठी वर्तुळाकार शटल बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारहाट, कार्यालयीन प्रवास व दैनंदिन कामांसाठी नागरिकांना २० ते २५ मिनिटांत एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचणे शक्य होईल. ही सेवा वेळ आणि खर्च वाचवणारी ठरेल.

 

याशिवाय, प्रभागातील नदीपात्राचे पर्यावरणपूरक पद्धतीने सुशोभीकरण व सुधारणा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने राबविला जाईल. कोणतीही पर्यावरणहानी न करता नागरिकांसाठी सुरक्षित, सुंदर आणि उपयुक्त सार्वजनिक जागा निर्माण केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले की, सनी निम्हण हे अनुभवी राजकीय पार्श्वभूमीतून आले असून त्यांचे वडील विनायक निम्हण यांनी या भागाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे. सनी निम्हण उच्चशिक्षित व जबाबदार व्यक्तिमत्त्व असून, नागरिकांच्या अपेक्षा वेळेत पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title : Aundh–Bopodi Development | Metro Shuttle & Riverfront Plan by Sunny Nimhhan

 

 

 

 

 

Local ad 1