बोपखेल येथील श्री बापुजीबुवा महाराज उत्सवासाठी समितीच्या अध्यक्षपदी घुले

पुणे : बोपखेल येथील मारुती मंदिर परिसरात ग्रामदैवत श्री बापुजीबुवा महाराज उत्सवानिमित्त नियोजन बैठक पार पडली. यावेळी यंदाचा उत्सव 10 ते 12 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्सवाचे नियोजन सुरळीत पार पाडण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

 

या बैठकीत समाजसेवक संतोष ज्ञानोबा घुले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी गोविंद महादेव घुले पाटील आणि रमेश उर्फ गजानन विठ्ठल देवकर यांची निवड झाली. अतुल नामदेव घुले यांची कार्याध्यक्ष, सागर रोहिदास घुले यांची उपकार्याध्यक्ष, अशोक तात्या बाराथे यांची सचिव, तर काळुराम सहादू मेदगे यांची उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

 

 

खजिनदार म्हणून नामदेव शिवाजी घुले आणि नवनाथ विष्णू घुले यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच कमलेश राजेंद्र घुले, करणराज श्रीरंग धोदाडे, श्रीकांत परशुराम घुले, एकनाथ भिकू वाळके आणि रविंद्र गोपाल कोवे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Local ad 1