...

ननवरे चौकातील रस्त्याचे नागरिकांच्या हस्ते लोकार्पण ; वाहतूक कोंडीला दिलासा

पुणे, २० सप्टेंबर २०२५ : गेल्या अनेक महिन्यांपासून ननवरे चौकाला जोडणाऱ्या डीपी रस्त्याचे काम अर्धवट राहिल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठी गैरसोय भासत होती. बिटवाईज चौकातून मोठा वळसा घ्यावा लागतो, वेळ वाया जात होता आणि वाहतुकीची कोंडी वाढत होती. (pune nanvare chowk road inauguration)

 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती स्पष्ट ; काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ

 

या समस्येवर पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष  बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर बाबुराव चांदेरे यांनी सोसायटीमधील नागरिकांच्या सहकार्याने सातत्याने पाठपुरावा केला. नागरिक आणि प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नातून प्रलंबित रस्त्याच्या कामाला गती मिळाली.

 

तीन दिवसांत पूर्ण झाले काम

ननवरे चौकात २३–२४ मीटर रुंदीचा आणि १०० फुटी लांबीचा नवा रस्ता साकारण्यात आला. १७ सप्टेंबर रोजी काम सुरू झाले आणि केवळ तीन दिवसांत, म्हणजेच २० सप्टेंबर रोजी, हा रस्ता पूर्ण करून सर्वसामान्य नागरिकांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या रस्त्यामुळे धनकुडे वस्ती, मोहन नगर, ननवरे वस्ती या परिसरातील रहिवाशांचे प्रवास सुलभ झाले आहे. बिटवाईज चौकातून वळसा घेण्याची गरज नाही, त्यामुळे ननवरे चौकातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.

 

 

मोठी बातमी : शताब्दी वर्षानिमित्त युवक काँग्रेस आरएसएसला देणार संविधान भेट – हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका

 

नागरिक सहभागातून साधलेले यश

बाबुराव चांदेरे म्हणाले “हा रस्ता नागरिकांच्या दीर्घकाळच्या समस्या दूर करणारे महत्त्वाचे पाऊल आहे. नागरिकांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि प्रशासनाने दिलेला प्रतिसाद यामुळे आज उद्घाटन सोसायटीतील नागरिकांच्या हस्ते झाले. विकासकामाचा लाभ जे घेतात, त्यांच्याच हातून झालेले उद्घाटन हे खरे लोकशाहीचे सामर्थ्य आहे. पुढेही बाणेर-सूस परिसरातील प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मी नागरिकांसोबत कटिबद्ध राहीन.”

 

 

विकासाचा नवीन टप्पा

हा रस्ता केवळ वाहतूक सुकर करणार नाही, तर नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा देणार आहे. नागरिकांचा सहभाग, प्रशासनाचा समन्वय आणि लोकशक्ती यामुळे साधलेले हे यश प्रेरणादायी ठरले आहे.

 

 

Local ad 1