...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी स्पष्ट केले कुणबी प्रमाणपत्र मिळणार ?

पुणे : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, *“मराठा आणि ओबीसी नेत्यांनी त्यांच्या समाजापुढे खरी वस्तुस्थिती मांडली पाहिजे. तोपर्यंत वाद संपणार नाही, तसेच समाजाचे हित साधले जाणार नाही.”  पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र बाबत सरकारचा अध्यादेश ओबीसींवर गदा आणणारा नाही. नकली व्यक्तींना ओबीसींमध्ये समाविष्ट होऊ दिले जाणार नाही. ज्यांच्याकडे ऐतिहासिक नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) मिळेल.

 

99 व्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटील – पुण्यात झालेल्या बैठकीत निर्णय

 

फडणवीस पुढे म्हणाले, “ओबीसींसाठी मंत्रालय उभारणारे, योजना राबवणारे, ‘महाज्योती’ संस्था स्थापन करणारे, ४२ वसतिगृहे उभारणारे आणि २७ टक्के आरक्षण परत देणारे हे आमचेच सरकार आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही.” काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “ओबीसींसाठी जे काही झाले ते आमच्या सरकारनेच केले. त्यामुळे वडेट्टीवारांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.”

 

MHADA Lottery Pune : गरीब खासदार-आमदारांसाठी म्हाडाच्या सोडतीत ११३ घरे राखीव

डीजेमुक्त महाराष्ट्र हीच सरकारची भूमिका आहे. गणेशोत्सवात महानगरांमध्ये डीजे वाजविणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. काही ठिकाणी सरकारने डीजेंवर कारवाई केली आहे. सणांमध्ये किंवा उत्सवांमध्ये डीजे वाजवू नका, असे सांगत आहोत. या संपूर्ण प्रक्रियेत लोकांची जागृती करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. जागृतीमधील नागरिकांनी डीजे वाजवायचे सोडले, तर अधिक चांगले आणि अधिक टिकणारे आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

प्राध्यापक भरती व विद्यापीठ रँकिंग
राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या रिक्त पदांवर बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, ८० टक्के पदे भरण्यास मान्यता मिळाली असून उर्वरित २० टक्के पदांसाठी लवकरच परवानगी दिली जाईल. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होईल. एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर कमी झाल्याने गुण खाली आले आहेत.  विद्यापीठांचे इतर घटक सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

कोणीही डोक वर काढले तर..
टोळीयुध्द वगैरे काही नसून, आपापासांतील वैर आहे. हे वैरही आम्ही चालू देणार नाही. कोणीही डोक वर काढले तर, त्याचे डोके कसे खाली करायचे हे सरकारला ठाऊक आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी पुण्यातील गुंडांना इशारा दिला आहे.शरद पवार साहेब कशासाठी प्रसिद्ध आहेत, हे आपाल्याला माहिती आहे. त्यांची एक्स नावाची एखादी गोष्ट म्हटली की आपण वाय समजायचे. पवार साहेब मोठे नेते आहे. त्यांच्याबाबत आपण फार बोलणे योग्य ठरणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Local ad 1