पुण्यात गोवा बनावट दारूचे ३०५ बॉक्स जप्त ; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
पुणे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख (State Excise Department Commissioner Dr. Rajesh Deshmukh) यांच्या मार्गदर्शनात राज्यात बनावट व बेकायदा मद्याची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी (15 मे) पुणे यांनी जुना पुणे-मुंबई हायवे, वल्लभनगर, बस स्थानकाच्या विरूध्द बाजूस, हायवेवर वाहनांची तपासणी करताना गोवा बनावटीचे 350 बाॅक्स असलेल्या मद्याचा साठा एका सहा चाकी वाहनात मिळून आला. मद्य साठ्यासह 52 लाख 28 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (350 boxes of Goa-made liquor seized in Pune)
Transfers of IPS officers । राज्यातील 26 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) जी विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे पिंपरीतील वल्लभनगर येथे येणाऱ्या संशयित वाहनांची झडती घेतली जात होती. त्यावेळी EICHER कंपनीच्या एका सहा चाकी वाहन क्र. MH-15-JC-1388 थांबवून त्याची तपासणी केली. त्यामध्ये गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यात विक्रीसाठी असलेली विदेशी मद्याचे रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे एकूण ३०५ बॉक्स मिळून आले. हा साठा वाहनासह जप्त करण्यात आला. या मद्याची महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठीची किमंत रु.२४ लाख ८८ हजार ८०० रुपये इतकी असून जप्त वाहनाची किमंत रु.२७ लाख ४० हजार इतकी आहे.
विशाल सुकलाल वराडे, वय ३१ वर्ष, रा. नशेराबाग, कुर्था, भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र-४२५३११ यास अटक करून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई विभागीय उप-आयुक्त, पुणे विभाग पुणे सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत साहेब, व उप-अधीक्षक, पिंपरी चिंचवड सुजित पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली जी विभागाचे निरीक्षक संजय केल्हे यांच्या पथकाने केली. त्यामध्ये दुय्यम निरीक्षक अभय औटे,बी.जी. रेडेकर, गणेश पठारे, व कर्मचारी प्रमोद पालवे, विजय घंदुरे, अमोल कांबळे, महिला जवान प्रिया चंदनशिवे, यांनी भाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक अभय औटे हे करीत आहेत.
उत्पादन शुल्क आवाहन
बेकायदेशीर मद्य व्यवसायात सामील असणाऱ्या व्यक्तींची माहिती स्थानीक राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांचे कार्यालयीन क्र.०२०-२६१२-७३२१ यावर कळवावे. तसेच अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास राज्य उत्पादन शुल्क, विभागाच्या टोल फ्री क्र. १८००२३३९९९९ व व्हॉटसअप क्र.८४२२००११३३ यावर संपर्क साधावा, असे आवहान करण्यात आले आहे. (350 boxes of Goa-made liquor seized in Pune)