10th च्या परिक्षेत 285 विद्यार्थ्यांना मिळाले प्रत्येक 35 टक्के गुण
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल 94.81 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा निकाल 1.02 टक्क्यांनी घसरला आहे. पुणे विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये पुणे जिल्हा अव्वल ठरला असून, जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार 816 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे ही टक्केवारी 97.26 टक्के इतकी आहे. पुणे जिल्ह्यातून 1 लाख 32 हजार 924 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 1 लाख 32 हजार 447 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. राज्यातील नऊ विभागातून 285 विद्यार्थी 35 टक्यावर झाले आहेत्. त्यात पुणे विभागात 59 नागपूर विभागात 63 छत्रपती संभाजी नगर मध्ये 28 मुंबईमध्ये कोल्हापूर मध्ये 13 अमरावतीमध्ये 28 नागपूर मध्ये 9 लातूरमध्ये 18 तर कोकणामध्ये 0 विद्यार्थी आहेत. (285 students scored 35 percent marks in 10th exam)
पुणे विभागीय अध्यक्ष औदुंबर उकिरडे निकाला संदर्भात माहिती देताना म्हणाले, पुणे विभागातून फेब्रुवारी -मार्च, 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नियमित विद्यार्थ्यांची संख्या 2 लाख 64 हजार 736 होती. यापैकी 2 लाख 63 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी 2 लाख 49 हजार 507 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या 9 हजार 707 होती. त्यापैकी 9 हजार 565 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये 5 हजार 883 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ही टक्केवारी 61.50 इतकी आहे. पुणे विभागात अहमदनगर जिल्ह्याचे निकाल 91.85 टक्के तर, सोलापूर जिल्ह्याचा निकाल 92.83 टक्के लागला आहे. विभागातील तिन्ही जिल्ह्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली असून, पुणे जिल्ह्यात 98.21 टक्के, अहमदनगर जिल्ह्यात 95.3 टक्के व सोलापूर जिल्ह्यात 96.10 टक्के हे मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण आहे. तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण पुण्यामध्ये 96.38 टक्के, अहमदनगरमध्ये 89.28 व सोलापूरमध्ये 90.4 टक्के आहे.
दहावीच्या निकालाची वैशिष्ट्ये 24 विषयांचा निकाल 100 टक्के यंदा दहावीची परीक्षा ही एकूण आठ भाषांमधून घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण 62 विषय होते. यापैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्णपुणे, लातूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई, अमरावती, नाशिक आणि कोकण या नऊ मंडळांमधून 15 लाख 58 हजार 20 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी फॉर्म भरले होते. यापैकी प्रत्यक्षात 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले. उत्तीर्णांची ही टक्केवारी 94.10 टक्के इतकी आहे. तर 86 हजार 641 विद्यार्थी नापास झाले आहेत.
39.44 टक्के रिपिटर्स उत्तीर्ण
राज्यात मार्च मध्ये दहावी पास होण्यासाठी प्रयत्न करणारे 24 हजार 376 पुनपरीक्षार्थी अर्थात रिपीटर्स दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा नशीब आजमावत होते. यापैकी 23,954 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 9,448 म्हणजे 39.44 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेला यंदा बाहेरून बसलेले म्हणजे 17 नंबरचा अर्ज भरुन (खाजगी) 28 हजार 20 विद्यार्थी बसले होते. यापैकी 22 हजार 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांची ही टक्केवारी 80.36 टक्के इतकी आहे. राज्यातून एकूण 9,585 दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 8,844 म्हणजे 92.27 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
पुणे विभागाचा निकाल..
दहावीच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वाधिक ९९.३२ टक्के तर सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्याचा ८२.६७ टक्के एवढा निकाल लागला आहे. पुणे जिल्ह्याचा निकाल 97.26 टक्के निकाल लागला आहे.
गैरप्रकार झालेल्या घटना
दहावी परीक्षेच्या कालावधीत एकूण ०६ एफआयआर नोंदवले गेले आहे. त्यात नागपूरमध्ये ०२ छत्रपती संभाजीनगर मध्ये ०१ अमरावतीमध्ये ०१ नाशिक मध्ये ०२ असे एकूण सहा एफ.आय.आर. नोंदवले गेले आहेत. दहावीच्या परीक्षा कालावधीत एकूण ३७ केंद्रांवर गैरप्रकार आढळून आलेले आहेत. यात छत्रपती संभाजी नगर मध्ये सर्वाधिक १३ त्यानंतर पुणे विभागात ०७ ,लातूर विभागात ०७ ,नागपूर विभागात ०७ मुंबई विभागात ०३ तर बाकी कोल्हापूर, अमरावती, नाशिक आणि कोकण विभागात ० गैरप्रकार आढळून आले आहेत.
विद्यार्थ्यांना मिळाली विशेष सवलत
संपूर्ण राज्यातून विशेष परवानगी 3 विद्यार्थ्यांना देण्यात आली. यामध्ये पुण्यातील एक आणि मुंबईमधील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहेत. पुण्यातील विद्यार्थ्यांला जास्त प्रकाश हवा असल्याने, हेड टॉर्च लावून पेपर देता आला तर, मुंबई विभागातील दोन विद्यार्थ्यांना उष्णतेमुळे अंगाला खाज येत असल्याने वातानुकुलित वर्गात बसून पेपर देण्याची परवानगी देण्यात आली.
काठावर पास होणारे 285 विद्यार्थी
राज्यातील नऊ विभागातून 285 विद्यार्थी 35 टक्यावर झाले आहेत्. त्यात पुणे विभागात 59 नागपूर विभागात 63 छत्रपती संभाजी नगर मध्ये 28 मुंबईमध्ये कोल्हापूर मध्ये 13 अमरावतीमध्ये 28 नागपूर मध्ये 9 लातूरमध्ये 18 तर कोकणामध्ये 0 विद्यार्थी आहेत.
34 हजार 393 अनुत्तीर्ण झालेल्यांना एटीकेटीची संधी
राज्यात इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या एकूण विध्यार्थ्यांपैकी एक किंवा दोन विषयात नापास झालेल्या 34 हजार 393 विध्यार्थ्यांना एटीकेटीची संधी मिळाली आहे. यामध्ये पुणे विभागात 4 हजार 998, नागपूर विभागात 3 हजार 916 ,छत्रपती संभाजीनगर विभागात 4 हजार 499, मुंबई विभागात 6 हजार 828, कोल्हापूर विभागात 1 हजार 433, अमरावती विभागात 3 हजार 537, नाशिक विभागात 6 हजार 325, लातूर विभागात 2 हजार 723, कोकण विभागात 134 विद्यार्थी आहेत.
,