आजचा दिवस दुहेरी आनंदाचा आहे. एकीकडे देशाचा अभिमान असलेला गणतंत्र दिवस, तर दुसरीकडे समाजसेवेचा आदर्श उभा करणारे रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस. संविधानाने दिलेल्या समानतेच्या, न्यायाच्या आणि बंधुत्वाच्या मूल्यांना त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरवले आहे. गरजू रुग्ण, विद्यार्थी आणि तरुणांसाठी केलेले कार्य हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवेचे उदाहरण आहे. गणतंत्र दिनी देशभक्ती आणि वाढदिवशी माणुसकीची सेवा या दोन्ही मूल्यांचा सुंदर संगम आज अनुभवायला मिळतो. हा दिवस समाजासाठी प्रेरणादायी ठरावा, हीच सदिच्छा ! (samajsevech aadarsh rohan survase patil)
आज *‘रुग्णहक्क जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट’*चे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस. हा दिवस केवळ त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचा क्षण नसून, समाजातील मानवता, करुणा आणि सेवाभाव यांना नवसंजीवनी देणारा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘रुग्णहक्क जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट’ने अल्पावधीतच गरजूंसाठी आशेचा किरण बनत समाजसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. सन २०२१ मध्ये रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या पत्नी शिवानी रोहन सुरवसे पाटील यांनी ‘रुग्णहक्क जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. स्वतः अभाव आणि संघर्षाचे दिवस पाहिलेल्या या दाम्पत्याने समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांचे दुःख जवळून अनुभवलं आहे. “एक काळ असा होता की रुग्णालयात जाण्यासाठी आमच्याकडे ५०० रुपयेही नव्हते,” असे भावूक शब्दांत सांगताना रोहन पाटील आजही त्या संघर्षाची आठवण काढतात. याच अनुभवातून इतरांच्या आयुष्याला आधार देण्याचा संकल्प त्यांनी केला आणि ट्रस्टची पायाभरणी झाली.
फिरायला, बसायला, शांतता अनुभवायला…पुण्यात नदीकाठावर तयार झाली खास जागा
स्थापनेपासून आजपर्यंत ट्रस्टने २० हजारांहून अधिक रुग्णांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वैद्यकीय मदत दिली आहे. रक्तदान शिबिरे, मोफत नेत्र तपासणी शिबिरे, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम अशा विविध सामाजिक कार्यक्रमांमधून ट्रस्टने आरोग्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, औषधोपचारासाठी मदत करणे, आवश्यक ते आर्थिक सहकार्य उपलब्ध करून देणे ही कामे ट्रस्ट सातत्याने करत आहे. आरोग्याबरोबरच शिक्षण क्षेत्रात ही ट्रस्टचे कार्य उल्लेखनीय आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देत त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे काम ट्रस्ट करत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा हा प्रयत्न निश्चितच दूरगामी परिणाम करणारा आहे.
समाजसेवेबरोबरच रोहन सुरवसे पाटील राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना बळकट करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, त्यांच्या संघटनात्मक क्षमतेची दखल घेतली जात आहे.
पुण्याची 10वी महिला महापौर कोण ? भाजपमधील ‘या’ नावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ !
व्यवसाय, समाजसेवा आणि राजकारण या तिन्ही आघाड्यांवर व्यस्त असतानाही ट्रस्टच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी शिवानी सुरवसे पाटील अत्यंत निष्ठेने सांभाळतात. ट्रस्टकडे आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीस ‘नाही’ असे उत्तर मिळत नाही, हेच या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. रोजगाराशी संबंधित अडचणी असोत, किंवा आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, रहिवासी दाखला यांसारखी शासकीय कागदपत्रे काढण्याची गरज प्रत्येक परिस्थितीत ट्रस्ट मदतीसाठी तत्पर असतो. याच समर्पणामुळे ट्रस्टवर नागरिकांचा प्रचंड विश्वास निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, ट्रस्टच्या माध्यमातून १३०० हून अधिक युवकांना आयटी क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्यात यश आले आहे. रोजगार मेळावे, मार्गदर्शन शिबिरे आणि समुपदेशनाच्या माध्यमातून तरुणांना योग्य दिशा देण्याचे कार्य ट्रस्ट करत असून, त्यामुळे अनेकांचे आयुष्य स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.रोहन सुरवसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ट्रस्टच्या कार्याचा लाभ घेतलेल्या असंख्य नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, त्यांच्या मते समाजसेवा ही प्रसिद्धीसाठी नसून, गरजूंच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या हास्यासाठी असते. हीच भावना ‘रुग्णहक्क जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या प्रत्येक उपक्रमातून दिसून येते.
आजचा दिवस म्हणजे समाजात मानवतेची ज्योत प्रज्वलित करणारा क्षण आहे. रुग्ण, विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य गरजूंसाठी उचललेली त्यांची पावले समाजासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याकडे पाहता हेच म्हणावे लागेल की, खऱ्या अर्थाने ईश्वरत्वाचा अनुभव मानवी सेवेतील निःस्वार्थ भावनेतूनच मिळतो. रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या ट्रस्टचे कार्य आपल्याला एकच संदेश देते, “रुग्णांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा” आणि समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे, हाच मानवतेचा खरा धर्म आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनीही या सेवायात्रेतून प्रेरणा घेऊन, आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी करण्याचा संकल्प करावा, हीच सदिच्छा.

