दादा तुम्ही गद्दारी का केली ? खासदार धैर्यशील मानेंना शिवसैनिकांचा सवाल

हातकणंगले : एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले खासदार धैर्यशील माने यांना थेट दाद तुम्ही गद्दारी का केली, असा थेट सवाल शिनसैनिकांनी केली. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यामध्ये काही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Question of Shiv Sainiks to MP Dhairyasheel Mane)

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकारला पायउतार व्हावे लागले.परिमाणी राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन शिवसेनेत गट निर्माण झाले होते. दोन्ही गटातील वाद टोकाला जाऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ही झडत आहेत. शिंदे गटाच्या आणि आताच्या शिवसेनेच्या आमदारांवर आणि नेत्यांवर ठाकरे गटाकडून गद्दारी केल्याचा आरोप केला जात आहे.

 

 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चंदूर या गावी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने गेले असता, त्यांची गाडी अडवत दादा तुम्ही गद्दारी का केली, असा थेट सवाल करतस त्यांचा ताफा अडवण्यात आला. (Question of Shiv Sainiks to MP Dhairyasheel Mane)

 

मोठी बातमी : न्यायालयाने आमदार बच्चू कडू यांना सुनावली दोन वर्षाची शिक्षा 

 

खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर धैर्यशील गटातील आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटावर जोरदार प्रतिहल्ला केला. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देत एकेमकांना बघून घेण्याची भाषा केली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (Question of Shiv Sainiks to MP Dhairyasheel Mane)

Local ad 1