नांदेडची तुलना बिहारशी करणाऱ्या आमदार सदाभाऊ खोतांच्या पुत्राचा प्रताप ; कार्यकर्त्याला घरात घुसून केली मारहाण
सांगली Crime news : सदाभाऊ खोत (MLA Sadabhau khot) यांच्यावर स्वाभिमानीकडून टीका होत असल्याच्या रागातून खोत यांच्या मुलाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani shetkari sanghatana) कार्यकर्त्याला मारहाण करण्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी सागर खोतसह (Sagar Khot) चौघांविरोधात सांगली जिल्ह्यातील कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपुर्वी सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी नांदेडची (Nanded) बिहारशी (Bihar) तुलना केली होती. या वक्तव्यानंतर खोत यांच्याच मुलाने खोत यांच्या होम ग्राऊंडवर राडेबाजी करत केलेली मारहाण पाहता नेमका ‘बिहार पॅटर्न’ (Bihar pattern) कुठे लागू आहे, अशी चर्चा आता रंगली आहे.
आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांच्यावर टीका करीत असल्याच्या रागातून मुलगा सागर खोत (sagar khot) याने आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तांबवे (ता. वाळवा) येथे सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani shetkari sanghatana) कार्यकर्ते रवीकिरण राजाराम माने (Ravikaran rajaram mane) (वय 35, रा. तांबवे, ता. वाळवा) यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविकिरण माने याने कासेगाव पोलीस ठाण्यात (Kasegaon police station) फिर्याद दिली आहे.
रवीकिरण माने (Ravikiran mane) यांच्या फिर्यादीनुसार सागर सदाभाऊ खोत (Sagar sadabhau khot) अभिजीत भांबुरे (Abhijit bhambure) स्वप्नील सूर्यवंशी (तिघेही रा. इस्लामपूर) आणि सत्यजीत कदम (रा. शिराळा) या चौघांविरोधात गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे.