खासदार संजय राऊतांचे आरोप एकनाथ शिंदेंनी फेटाळले, काय होता आरोप जाणून घ्या !

Shiv Sena MLA Latest Updates : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena leader Eknath Shinde) यांनी आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी (Rebellion) केली आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी आमदारांचे अपहरण झाले असून, काहींना मारहाण झाल्याचा आरोप केला होता. हे आरोप एकनाथ शिंदे यांनी फेटाळला आहे. (Eknath Shinde refutes MP Sanjay Raut’s allegations)

 

 

 

सगळेजण आनंदात आहेत, कुणालाही मारहाण, जबरदस्ती करण्यात आलेली नाही. आमदारांच्या मनात अनेक वर्षांपासून खदखद आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde refutes MP Sanjay Raut’s allegations)

 

 

 शिवसेनेच्या दहाएक आमदारांना ‘उचलून’ गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सुटका करुन घेतली आहे. (Eknath Shinde refutes MP Sanjay Raut’s allegations)
Local ad 1