पुणे शहरात महाअभियान 2025 : स्वच्छतेसाठी आयुक्त नवल किशोर राम यांची मोठी घोषणा !

प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यावर भर

पुणे, पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिका लवकरच विशेष स्वच्छता अभियान राबवणार आहे. या अभियानात नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सक्रीय सहभाग वाढवला जाणार असून, प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी यासंदर्भात माहिती दिली. (pune swachhata abhiyan commissioner naval kishor ram)

 

नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी : वंदे भारत एक्सप्रेस थेट नांदेड ते मुंबई धावणार !

महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राम यांनी स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी त्यांनी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. या वेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

आयुक्त राम म्हणाले की, “देशपातळीवरील स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर पुण्यात सशक्त उपक्रम राबविणार आहोत. संस्थांच्या सहभागातून उपक्रम प्रभावी होईल. केवळ महापालिकेवर नाही, तर नागरिकांचाही सहभाग अत्यंत आवश्यक आहे.” (pune swachhata abhiyan commissioner naval kishor ram)

 

स्वच्छतेतील त्रुटी मान्य करताना, आयुक्तांनी स्पष्ट केले की, काही भागांमध्ये अकार्यक्षमता आहे. सफाई कामगारांच्या उपस्थितीसाठी पूर्वी लागू केलेली ‘वॉच’ प्रणाली पुन्हा अंमलात आणली जाणार आहे. (pune swachhata abhiyan commissioner naval kishor ram)

 

या उपक्रमांमुळे शहराच्या स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था आणि पुणेकर नागरिक एकत्र येऊन पुणे पुन्हा ‘स्वच्छ शहर’ म्हणून ओळखले जावे, यासाठी प्रयत्नशील आहेत.

Local ad 1